भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदत लातूर, दि. १७ : अनुसूचित जाती व नवबुद्ध समाजाच्या घटकांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यास ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. शासन निर्णय क्रमांक बीएसीएच-२०१६/प्र.क्र.२९३/शिक्षण-२, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-३२, दिनांक २६/१२/२०२४ अन्वये या योजनेत सुधारणा करण्यात आली असून, ही योजना २०१७ पासून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन स्तरावरून निश्चित करण्यात आल्या असून, सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. या योजनेकरिता शासन निर्णयातील नमूद अटी व शर्तींच्या अनुषंगाने या कार्यालयाच्या महा-आयटी पोर्टलवर सन २०२६-२७ मधील ‘सेंन्ट बॅक’ अर्जांना त्रुटीपूर्ता करण्यासाठी विद्यार्थी लॉगिनवर (सेंन्ट बॅक) पाठविण्यात आले आहेत. अर्जांची त्रुटीपूर्ता करण्यासाठी महा-आयटकडून संदेश पाठविण्यात आला असून, विद्यार्थ्यांना त्रुटीपूर्ततेसाठी दूरध्वनीद्वारे व्हॉट्सॲप संदेश व संपर्कही साधण्यात आला आहे. या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी विद्यार्थ्याना ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे. सन २०२६-२७ मधील ‘सेंन्ट बॅक’ व विद्यार्थी लॉगिनवर प्रलंबित अर्जावर या कार्यालयकडून कार्यवाही करता येत नसल्यामुळे, ऑनलाइन अर्ज त्रुटीपूर्तेअभावी प्रलंबित राहिल्यास आणि संबंधित विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित विद्यार्थ्याचीच राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तरी सन २०२६-२७ मधील ‘सेंन्ट बॅक’ अर्जाकरिता विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनवर जाऊन आवश्यक त्या सर्व त्रुटी पूर्ण कराव्यात आणि ऑनलाइन अर्ज ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन