Posts

खरीप हंगामात अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन

  खरीप हंगामात अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धेचे आयोजन लातूर , दि. 26 (जिमाका) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यानुसार कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात , ज्वारी , बाजरी , मका , नाचणी (रागी) , तूर , मूग , उडीद ,   सोयाबीन , भुईमुग , सुर्यफुल या अकरा पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तसेच भात , ज्वारी , बाजरी , मका , नाचणी (रागी) , तूर , सोयाबीन , भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी 31 ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र असून सर्वसाधारण गटासाठी तीनशे रुपये आणि आदिवासी गटासाठी दीडशे रुपये राहिल.   स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी   शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या   नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असण...

शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे जादा पैसे घेतल्यास सामूहिक सेवा केंद्राचा परवाना होणार रद्द

  शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे जादा पैसे घेतल्यास सामूहिक सेवा केंद्राचा परवाना होणार रद्द लातूर , दि. 26 (जिमाका) : या वर्षीपासून खरीप 2023 ते रब्बी 2025-26 या तीन वर्षांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेत शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरून या विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रांना विमा कंपनीमार्फत प्रत्येक अर्जासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून 40 रुपये देण्यात येते. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज भरताना सामूहिक सेवा केंद्रधारकाने विमा हप्त्याच्या एक रुपयापेक्षा जादा रक्कम घेतल्यास त्याचा परवाना रद्द करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी कळविले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकरी https://pmfby.gov.in या संकेतस्थळावरून स्वतः अर्ज व विमा हप्ता भरता येईल. तसेच बँक , विमा केपनीप्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र यांच्या माध्यामातून पीक ...

लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे कारगिल विजय दिवस साजरा

Image
  लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे कारगिल विजय दिवस साजरा लातूर , दि. 26 (जिमाका) : जिल्हा क्रीडा संकुल येथील शहीद युद्ध स्मारक परिसरात 24 व्या कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमात शहीद सैनिकांच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले . कर्नल (नि.) शरद पांढरे यांच्यासह भारतीय माजी सैनिक संघट नेचे पदाधिकारी , जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सर्व कर्मचारी , माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी , वीरपत्नी , वीरमाता व विरपिता यांची उपस्थिती होती. कारगिल युध्दात शहीद झालेल्या जवानांच्या वारसां चा व शहीद जवान सुर्यंवशी प्रमोद नारायणराव यांच्या कुटुंबियांचा ले . कर्नल (नि.) शरद पांढरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी 31 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी 31 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन लातूर , दि. 25 (जिमाका) : राज्यस्तरीय योजने अंतर्गत सुरु असलेली गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही नवीन सुधारीत योजना सुरु करण्याबाबत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गोशाळांनी 26 जुलै 2023 ते 31 जुलै 2023 या कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब कदम यांनी केले आहे. या योजनेंतर्गत निवडण्यात येणाऱ्या गोशाळेस त्यांच्याकडे असलेल्या पशुधन संख्येनुसार अनुदान दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. गोशाळेत 50 ते 100 पशुधन असल्यास 15 लाख रुपये , 101 ते 200 पशुधन असल्यास 20 लाख रुपये आणि 200 पेक्षा जास्त पशुधन असल्यास 25 लाख रुपये अनुदान देण्यात येईल. पहिल्या टप्प्यात 60 टक्के , तर दुसऱ्या टप्प्यात 40 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना , मार्गदर्शक सूचना , अर्ज करण्याची पद्धत याविषयीची माहिती पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे उपलब्ध आहे. या क्षेत्रामध्ये काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्रासह अर्ज करावेत , असे आवाहन डॉ. कदम यांनी केले आहे. *****

औसा तालुक्यात सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर स्थापन होणार सघन कुक्कुट विकास गट

  औसा तालुक्यात सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर स्थापन होणार सघन कुक्कुट विकास गट अनुसूचित जाती महिला लाभार्थ्याच्या निवडीसाठी अर्ज मागविले लातूर , दि. 25 ( जिमाका) :   सन 2021-22 अंतर्गत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेसाठी अनुसूचित जातीच्या एका लाभार्थीची   निवड करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत औसा पंचायत सामितीचे पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत , असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन. एस. कदम यांनी केले आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये असून लाभार्थ्याला शासनाचे 50 टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 देय राहील.   उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थ्याने स्वत:चा हिस्सा किंवा वित्तीय संस्थाकडून कर्ज घेवून उभा करावी लागेल , असे डॉ. कदम यांनी कळविले आहे. *****

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्यास 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्यास 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ लातूर , दि. 25 (जिमाका): राज्यातील नोंदणीकृत मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी 11 ऑक्टोबर 2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. 31 मे 2023 रोजीच्या पत्रान्वये ही योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यात येत असून या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास 10 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंर्गत संस्था चालक, मदरसा चालकांनी शासन निर्णयाप्रमाणे विहीत नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव 10 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी , नवीन जिल्हाधिकारी कार्यालय , बार्शी रोड , लातूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुशिंग यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. *****  

अल्पसंख्याक संस्थांच्या अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

  अल्पसंख्याक संस्थांच्या अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ ·         10 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करता येणार लातूर , दि. 25 (जिमाका) : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित , विनाअनुदानित , कायम विनाअनुदानित शाळा , कनिष्ठ महाविद्यालये , औद्योगीक प्रशिक्षण संस्था , नगरपालिका , नगरपरिषदशाळा व दिव्यांगांच्या शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या 18 जुलै 2023 रोजीच्या पत्रानुसार ही योजना राबविण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेसाठी 10 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. अल्पसंख्यांक विभागाच्या 7 ऑक्टोबर 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा , कनिष्ठ महाविद्यालये , औद्योगीक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी संस्था चालकांनी 10 ऑगस्ट 2023 पर्यंत विहित नमुन्यातील परिपूर्ण...