Posts

Image
  लातूर शहर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील 307 शाळांमध्ये पालक मेळाव्याद्वारे मतदार जागृती ! ·         लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उपक्रम लातूर ,   दि.   29   :      लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 235- लातूर शहर मतदारसंघामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी रोहिणी नेऱ्हे-विरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली 307 शाळांमध्ये 26 मार्च 2024 रोजी पालक मेळावे आयोजित करण्यात आले होते. मतदार जागृतीसाठी पालक मेळावे या नाविण्यपूर्ण उपक्रमा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमार्फत पालकांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्यात आली. यावेळी पालकांना मतदान करण्याबाबतचे संकल्पपत्र देवून मतदानाचे महत्व सांगण्या त आले. तसेच उपस्थित पालकांना जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या पॉवर ...

अवैध पाणी उपसा रोखण्याची कार्यवाही गतिमान करावी-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 अवैध पाणी उपसा रोखण्याची कार्यवाही गतिमान करावी-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे • जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा • अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथके स्थापन लातूर, दि. 26 : जिल्ह्यातील जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या पाण्याचा अवैधरित्या उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. जिल्ह्यातील पाणी टंचाईविषयक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांच्यासह महानगरपालिका, पशुसंवर्धन विभाग, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीला उपस्थिती होती. जिल्ह्यात पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी प्रकल्पाशी संबंधित जलसंपदा अथवा जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता, महावितरणचे शाखा अभियंता, संबंधित महसूल मंडळ अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक यांची पथके गठीत करण्यात आली आहेत. या पथकांनी ...

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती

Image
  जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती लातूर ,   दि.   26   :   जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली २४ मार्च २०२४ रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित जनजगागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता उदय मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी     डॉ. वडगावे एच.व्ही. यांच्या हस्ते हिरवा झेंडी दाखवून करण्यात आले. रॅलीसाठी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.प्रविण ढगे, डॉ.विद्या गुरुडे,  डॉ.पाठक एस.जी., जिल्हा क्षयरोग अधिकारी श्रीमती डॉ. एस.एन.तांबारे, डॉ.मोनिका पाटील, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. महेश पाटील, डॉ.अनंत कलमे, डॉ .हर्षवर्धन राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपनर डी.के., जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब जाधव यावेळी उपस्थित होते. या रॅलीमध्ये शहरातील विविध भागातून जनजागृती करण्यात आली आहे. महात्मा गांधी चौक, बस स्थानक, गंज गोलाईम...

पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडाराचे व्यवहार 27 ते 31 मार्च दरम्यान राहणार बंद

  पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय भांडाराचे व्यवहार 27 ते 31 मार्च दरम्यान राहणार बंद लातूर, दि. 26 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या विभागीय भंडारामधील पुस्तके व कागदाची वार्षिक प्रत्यक्ष साठा मोजणी होणार असल्याने 27 मार्च ते 31 मार्च 2024 या कालावधीत मंडळाची गोरेगाव, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक, कोल्हापूर, पनवेल व अमरावती येथील आवक-जावक, विक्री इत्यादी सर्व व्यवहार बंदर राहणार असल्याचे पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी कळविले आहे.

लातूर महानगरपालिका क्षेत्रात 24 मार्च रोजी वाईन शॉप, बिअर शॉपच्या कालावधीत वाढ

  लातूर महानगरपालिका क्षेत्रात 24 मार्च रोजी वाईन शॉप, बिअर शॉपच्या कालावधीत वाढ लातूर ,  दि.  2 3 :   होळी अथवा रंगपंचमीला वाईन शॉप (एफएल-1), बिअर शॉप (एफएल बीआर-१) या अस्थापना निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीमध्ये उघड्या ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार लातूर महानगरपालिका क्षेत्रातील वाईन शॉप (एफएल-1), बिअर शॉप (एफएल बीआर-१) या अनुज्ञप्ती प्रकारातील आस्थापना सुरु ठेवण्यास 24 मार्च 2024 रोजी रात्री 10.30 ते 12 वाजेपर्यंतच्या वाढीव वेळे देण्यात आल्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने निर्गमित केले आहेत.

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीत चेक पोस्ट, भरारी पथकांवर महत्वपूर्ण जबाबदारी - मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर

                                         आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीत चेक पोस्ट, भरारी पथकांवर महत्वपूर्ण जबाबदारी -           मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर ·         चेक पोस्ट, भरारी पथकांच्या प्रमुखांची आढावा बैठक लातूर ,  दि.  20  :  जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होण्यामध्ये विविध ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या चेक पोस्ट आणि भरारी पथकांची जबाबदारी महत्वाची असल्याचे जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले. चेक पोस्ट, भरारी पथक प्रमुखांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत श्री. सागर बोलत होते. जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी तथा लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपमुख्य कार्यकारी अ...

भरारी पथके, चेक पोस्टच्या माध्यमातून आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Image
                                          भरारी पथके, चेक पोस्टच्या माध्यमातून आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करा -           जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ·           आदर्श आचारसंहिता, सी-व्हिजीलबाबत आढावा ·         सी-व्हिजीलद्वारे प्राप्त तक्रारींची तातडीने दखल घेवून निपटारा करा लातूर ,  दि.  20  :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू असून या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके, चेक पोस्ट स्थापन करण्यात आले आहेत. याकरिता नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आज येथे केल्या. आदर्श आचारसंहिता कक्ष आणि सी व्हिजील ॲप, मतदान केंद्रांवरील कायदा व सुव्यवस्था यासह निवडणूक आयोगामार्फत कार्यान्वित विविध ॲपच्या अनुषंगाने सुरु असलेल्या...