मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जास्तीत जास्त युवक - युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जास्तीत जास्त युवक - युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन लातूर,दि.8: राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून नोकरी मिळण्याची त्यांची क्षमता वाढविण्यासाठी ‘ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. यासाठी बारावी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय, पदविका 8 हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थ्यांना 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक - युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त बालाजी मरे यांनी केले आहे. लघु आणि मध्यम व मोठे उद्योग य...