महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी, कर्मचारी यांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव
महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी, कर्मचारी यांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव लातूर दि.1 ( जि.मा.का ) महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनी राष्ट्रध्वज वंदन व संचालनानंतर आयोजित विशेष समारंभात जिल्ह्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तसेच यावेळी विविध विभागात अनुकंपाखाली घेतलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा आदेश जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेस नवी दिल्ली या संस्थेचा यंग रिसर्चर अवॉर्ड -23, द इको इनोवेशन अवॉर्ड, लाईफ टाईम ॲच्युमेंट अवॉर्ड पर्यावरण व जलसंरक्षण या क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन अधिकारी रामदास कोकरे यांना शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. वेंगुर्ला नगर परिषद जिल्हा सिंधुदुर्ग येथे त्यांनी राबविलेल्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची दखल घेवून या प्रकल्पाचा समावेश सीबीएससीच्या इय्यता सहावीच्या व...