येत्या 18 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

 

येत्या 18 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या

आरोग्य तपासणी  शिबीराचे आयोजन

 

          लातूर,दि.17(जिमाका):-  आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडुन दिनांक  1 एप्रिल 2023 ते 1 मे,  2023 या सामाजिक न्याय पर्व अभियान अंतर्गत विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

          त्यानुषंगाने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय, बाभळगांव ता. जि. लातूर येथे  दिनांक 18 एप्रिल, 2023 सकाळी  9-00 वाजता आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

               तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी सदरील आरोग्य तपासणी शिबीरामध्ये भाग घेवून आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन शिवकांत चिकुर्ते सहायक  आयुक्‍त समाज कल्‍याण लातूर यांनी केले आहे.

 

                                                           ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा