कृषि निविष्ठा विषयक तक्रारींच्या निवारणासाठी कृषि आयुक्त, विभागीय स्तरावर संनियंत्रण कक्षाची स्थापना
कृषि निविष्ठा विषयक तक्रारींच्या निवारणासाठी
कृषि आयुक्त, विभागीय स्तरावर संनियंत्रण कक्षाची स्थापना
· कृषि निविष्ठा उपलब्धतेबाबत तक्रारी स्वीकारणार
लातूर, दि. 12 (जिमाका) : कृषि निविष्ठांच्या गुणवत्ता व पुरवठ्याविषयी खरीप हंगामात येणाऱ्या अडचणीचे तत्काळ निराकरण करण्यासाठी कृषि आयुक्त स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत हा कक्ष कार्यरत राहील. या कक्षाचा संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक 8446117500 असून टोल फ्री क्रमांक 18002334000 असा आहे. तसेच controlroom.qc.maharashtra@
लातूर विभागीय स्तरावरही संनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात संपर्क अधिकारी म्हणून विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयातील गुणवत्ता निवारण तंत्र अधिकारी पी. व्ही. भोर (भ्रमणध्वनी क्र. 7972428581) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक एस. एच. मोरे (भ्रमणध्वनी क्र. 9422409786), कनिष्ठ लिपीक एल. आय. कदम (भ्रमणध्वनी क्र.9890970419) यांचीही विभाग स्तरीय संनियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे. निविष्ठांच्या उपलब्धतेबाबत, गुणवत्तेबाबत तसेच इतर अडचणी, तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी विभाग स्तरीय संनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषि सह संचालक एस. के. दिवेकर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment