भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
लातूर, दि. 14 (जिमाका) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
समाज कल्याण विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झालेल्या
या कर्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त
शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्यासह
अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment