घटना प्रतिसाद प्रणालीबाबत लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 

घटना प्रतिसाद प्रणालीबाबत

लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

 


लातूर, दि. 26 (जिमाका):
 लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नियोजित दुसरे घटना प्रतिसाद प्रणाली आयआरएस (IRS)  प्रशिक्षण कार्यक्रम पार पडले या प्रशिक्षणात उस्मानाबाद जिल्ह्यातील                                 11 कर्मचारी आणि लातूर जिल्ह्यातील 16 असे एकूण 27 जण उपस्थित होते.


जिल्ह्यात घडणाऱ्या घटनाची माहिती, पूर्वसूचना, आपत्ती प्रतिसादासाठी आवश्यक संसाधने, अति महत्वाचे दूरध्वनी क्रमांक, घटना घडल्यानंतर त्याच्या नोंदी त्याचबरोबर विविध प्रकारचे कुशल व अकुशल ह्युमन रिसोर्स इत्यादी ची माहिती या प्रणाली द्वारे उपलब्ध होणार आहे. या प्रणालीचा वापर तालुकास्तरावर तसेच जिल्हास्तरावरील विविध विभागाच्या माध्यमातून होणार असून या प्रणालीला वेगवेगळ्या पोर्टलची संलग्नित केले जाणार आहे. सदरील प्रशिक्षण तालुकास्तरावरील नैसर्गिक तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्तीचे कामकाज करणारे कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या प्रणालीचा तपशीलवार प्रशिक्षण मंत्रालयाकडून नियुक्त तज्ञ ब्रिजेश शर्मा, प्रकाश राठोड, इमरान सय्यद यांच्यामार्फत देण्यात आले सदरील प्रशिक्षणात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उस्मानाबाद श्रीमती वृशाली तेलोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी लातूर साकेब उस्मानी उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम वाघमारे, बाला - किरण जाधव, करीम शेख इत्यादींनी परिश्रम घेतले.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु