रमजान ईद उत्सवानिमित्त जिल्ह्यातील मद्यविक्री बंद राहणार
रमजान ईद उत्सवानिमित्त जिल्ह्यातील मद्यविक्री
बंद राहणार
*लातूर,
दि.20 (जिमाका):* जिल्ह्यात 22 एप्रिल,
2023 ( एक दिवस पुढे - मागे) रोजी रमजान ईद उत्सव साजरा होणार असल्याने या दिवशी
जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहणार आहेत. याबाबतचे
आदेश प्रभारी जिल्हाधिकारी, लातूर यांनी निर्गमित केले ओहत.
या
आदेशानुसार एलएल-2 (विदेशी, देशी किरकोळ विक्री), एफएल, बिअर-2 (सिलबंद बाटलीतून
बिअर विक्री), एफएल-3 (परवाना कक्ष अनुज्ञप्ती), सीएल-3 (देशी दारु किरकोळ विक्री
अनुज्ञप्ती), टड-1 (ताडी अनुज्ञप्ती) या जे अनुज्ञप्ती बंद राहतील. या आदेशाची अंमलबजावणी
करण्यास कुचराई करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 व
अनुषांगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी जिल्हाधिकारी,
लातूर यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.
****
Comments
Post a Comment