समाज कल्याण विभागामार्फत 30 एप्रिल रोजी एकंबी तांडा येथे ऊसतोड कामगारांसाठी शिबीर
समाज कल्याण विभागामार्फत
30 एप्रिल रोजी एकंबी तांडा
येथे ऊसतोड कामगारांसाठी शिबीर
लातूर, दि. 28 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागाकडून 1 एप्रिल ते 1 मे या कालावधीत सामाजिक न्याय पर्व अभियान राबविण्यात
येत आहे. यामध्ये समाज कल्याण आयुक्त यांच्या सूचनेनुसार समाज कल्याण विभागाच्या
विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
आहे. या अंतर्गत 30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता औसा तालुक्यातील एकंबी
तांडा येथे ऊसतोड कामगारांसाठी एकदिवसीय पुनरागमन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी या आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिरात भाग घेवून आपली
आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत
चिकुर्ते यांनी केले आहे. अधिक
माहितीसाठी समाज कल्याण र्यालयातील समाज कल्याण निरीक्षक संदेश घुगे (भ्रमणध्वनी
क्र. ९४०५४४६२१६) व कनिष्ठ लिपीक शिवाजी पांढरे (भ्रमणध्वनी क्र. ९८२३७६८१८८) यांच्याशी
संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले
आहे.
*****
Comments
Post a Comment