जिल्ह्यातील 128 गावाची जलयुक्त अभियानासाठी निवड , संबंधित गावात तात्काळ विशेष ग्राम सभा, शिवार फेरी घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

                                        जिल्ह्यातील 128 गावाची जलयुक्त अभियानासाठी निवड

 

संबंधित गावात तात्काळ विशेष ग्राम सभा, शिवार फेरी घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

 

*जिल्ह्यातील जल संवर्धनासाठी निती आयोगाने दिले 22  सूचक मुद्दे*

 


लातूर दि.5 ( जिमाका ) राज्य शासनाने पुनःश्च जलयुक्त अभियान ही योजना सुरु केली असून त्यासाठी जिल्ह्यातील 128 गावाची निवड करण्यात आली असून त्यासाठी संबंधित गावात तात्काळ विशेष ग्रामसभा आणि शिवार फेरी करून 20 एप्रिल पर्यंत या गावातील कामाचा आराखडा सादर करावा असे आदेश आज जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला उपजिल्हाधिकारी ( रोहयो ) सुचित्रा सुगावे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस. कांबळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जेवरे, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश बिराजदार आणि 'भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 लातूर जिल्ह्यातील ज्या 128 गावात जलयुक्त शिवार अभियान राबवायचे आहे, त्या गावात तात्काळ विशेष ग्राम सभा जिल्हा परिषदेकडून बोलविण्यात यावी तसेच गावची शिवार फेरी आयोजित करावी. जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार अभियानात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे उद्या आणि परवा ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आजच्या बैठकीत दिल्या.

 

*भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाचा एम.ओ.यु.*

जलयुक्त शिवार अभियानात बी.जे.एस म्हणजेच भारतीय जैन संघटना यावेळीही जलयुक्त शिवार अभियानात मदत करणार असून त्यासाठी राज्य स्तरावर सामंजस्य करार ( एम.ओ. यु ) करण्यात आले आहे. आज लातूर जिल्हाधिकारी आणि भारतीय जैन संघटना प्रतिनिधी यांच्यातही जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानासाठी करार करण्यात आला.

 

*निती आयोगाने जल संवर्धनासाठी दिले 22 सूचक मुद्दे*

 

लातूर जिल्ह्यातील भुगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी आणि एकूणच जलसंवर्धानासाठी 22 मुद्दे सूचित केले असून त्या अनुषंगाने आता जिल्ह्यात काम होईल अशी माहितीही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु