डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

लातूर,दि.27(जिमाका): अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना शेती अर्थसहाय्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन 2023-24 साठी राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑलनाईन अर्ज स्विकारण्यात येत आहेत.तरी इच्छुक शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्रात जावून आपले अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने केले आहे.

या योजनेत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळयाचे प्लास्टिक अस्तरीकरण तसेच वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच, ठिबक सिंचन, तुषार सिंचन संच, परसबाग, पंपसंच (डिझेल,विद्युत), पीव्हीसी , एचडीपीई पाईप अशा बाबींचा लाभ दिला जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र, सातबारा, आठ अ उतारा (0.40 ते 6.0 हे. मधील), आधार कार्ड,आधार संलग्न बँक खाते, 1 लाख 50 हजारच्या आतील उत्पन्न असल्याचा सन2022-23 तहसिलदार यांचा दाखला, ग्रामसभा ठराव, प्रस्तावातील इतर आवश्यक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

ज्या शेतकऱ्यांनी यापुर्वी केंद्र, राज्य, जिल्हा परिषद अथवा इतर कोणत्याही शासकीय योजनेतून नवीन सिंचन विहीरीचा लाभ घेतला नाही, अशा शेतकऱ्यांनी नवीन विहीरीसाठी व ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांनी इतर बाबींसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव व कृषि विकास अधिकारी एस.आर. चोले यांनी केले आहे.

                                                ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु