क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
लातूर,दि.11(जिमाका):- 11 एप्रिल हा दिवस क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म दिवस, महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्याकडून संपुर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात येते आहे. त्यानिमित्ताने जिल्हास्तरावर विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले.
लातूर जिल्ह्यामध्ये दि. 11 एप्रिल हा दिवस क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिनानिमित्त सकाळी 8-00 वाजता महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी हिरवा झेंडा दाखवून अभिवादन रॅलीची सुरुवात केली व सदर रॅली गांधी चौक, हनुमान चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवनेरी गेट येथे सांगता झाली. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील आश्रमशाळेतील व धनगर समाज इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेतील विदयार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
दि. 11 एप्रिल, 2023 रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जयंतीचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते महात्माज्योतिबा फुले, राजर्षी शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग दिलीपकुमार राठोड व प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
सदर जयंती दिनानिमित्त विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, एकांकीका स्पर्धा इत्यादी स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय, तृतीय आलेल्या गुणवंताचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच सदर कार्यक्रमामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनाबद्दल व कार्याबद्दल प्रमुख वक्ते प्रा. गोविंद जाधव व प्रा. डॉ. विवेक सौताडकर यांनी आपले विचार मांडले. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दिलीपकुमार राठोड यांनी अध्यक्षीय समारोप केला तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सास्तुकर यांनी केले व आभार प्रदर्शन नागेश जाधव यांनी केले.
या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार व दिलीपकुमार राठोड, प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, लातूर, प्रा. गोविंद जाधव व प्रा. डॉ. विवेक सौताडकर,
वित्त व लेखा विभागाचे सहाय्यक संचालक श्री. डाके, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी लेखाधिकारी मनोज सकट, सेवानिवृत्त वसकनि प्रमोद जेटीथोर व प्रादेशिक उपायुक्त, प्रादेशिक उपसंचालक, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment