सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून आयोजित ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी पुढे ढकलली
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून आयोजित
ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी पुढे ढकलली
लातूर,दि.6(जिमाका):- आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नाविण्यपुर्ण उपक्रमात दिनांक 01 एप्रिल 2023 ते 01 मे 2023 या कालावधीत समता पर्व अभियानातंर्गत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनाच्या अनुषंगाने जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने हा उपक्रम हाती घेतला होता. त्यात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार होती. आता ती पुढे ढकलली आहे.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त 07 एप्रिल रोजी आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्याचे आदेशित करण्यात आलेले होते.
त्यानुसार लातूर जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात आलेले होते की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मार्केट यार्ड, शिवनेरी गेट समोर, डाल्डा फॅक्टरी कंपाऊंड, लातूर येथे दि.07 एप्रिल 2023 रोजी ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केलेले होते. परंतु कांही तांत्रीक अडचणीमुळे आरोग्य विभागाचे आरोग्य तपासणी कर्मचारी उपलब्ध न झाल्यामुळे दि.07 एप्रिल 2023 ची आरोग्य शिबीराची तारीख यथावकाश कळविण्यात येईल याची नांदे घ्यावी.
Comments
Post a Comment