सामाजिक न्याय विभागामार्फत ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकांचे आरोग्य शिबीर; 153 व्यक्तींची झाली तपासणी

 

सामाजिक न्याय विभागामार्फत

ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकांचे आरोग्य शिबीर;

153 व्यक्तींची झाली तपासणी

 


लातूर, दि. 24 (जिमाका):
  अतिदुर्बल व वंचीत घटकांना सामाजिक न्याय विभागामार्फत अशा ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य शिबीर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे सपंप्प झाले. यावेळी 153 व्यक्तींची तनपासणी करण्यात आली. 

आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दि. 1 एप्रिल, 2023 ते 1 मे, 2023 या सामाजिक न्याय पर्व अभियानाअंतर्गत विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत या कार्यालयास कळविले आहे.


जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, ऊसतोड कामगार व तृतीयपंथी व्यक्तींसाठी  जनजागृती व आरोग्य शिबीराचे आयोजन दिनांक 23 एप्रिल, 2023 रोजी बाह्यरुग्ण विभाग (अतिविषेशोपचार रुग्णालयीन इमारत), विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे बाह्यरुग्ण विभाग सकाळी 9-00 ते दुपारी 1-00 या वेळेत आयोजीत करण्यात आलेले होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक जनजागृती व आरोग्य शिबीरात जेष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश घादगिने बोलताना म्हणाले की,  अतिदुर्बल व वंचीत घटकांना खरोखरच सामाजिक न्याय विभागामार्फत अशा विविध उपक्रमातून न्याय दिला जातो.  त्यामुळे असे उपक्रम होत रहावेत, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या शिबीरासाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन सवई व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील सर्व विभागाचे विभागप्रमुख तसेच सर्व कर्मचारी वृंद व ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव   प्रकाश घादगिने, लातूरकर तृतीयपंथी समितीतील सदस्य प्रिती माऊली यांची उपस्थिती  होती.

शासकीय आरोग्य सेवा ही वंचीत व दुर्बल घटकांसहीत सर्व मानव जीवनासाठी संजीवणी असते असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील वैद्यकीय अधिक्षक                    डॉ. सचिन जाधव प्रतिपादन केले.

या आरोग्य तपासणी शिबीरामध्ये लातूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, ऊसतोड कामगार अशा 153 व्यक्तींनी  सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी केली. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी या शिबीरास विशेष भेट दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम शिंदे यांनी केले. तर प्रस्ताविक पांढरे शिवाजी यांनी केले. मनोज मोरे, अमोल मुळे व गंगाधर जोगदंडकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नागेश जाधव यांनी केले. समाज कल्याण कार्यालयाकडून शिबीरासाठी उपस्थित असलेल्या जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी, ऊसतोड कामगार यांना अल्पोपहाराची सोय करण्यात आलेली होती. कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. 

****

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु