जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नोकरीसाठी “जागेवरच निवड संधी"
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना
प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नोकरीसाठी “जागेवरच निवड संधी"
लातूर दि.10 ( जि.मा.का ) जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार
युवक युवतींना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नोकरीसाठी “जागेवरच निवड संधी” या मोहिमेअंतर्गत
रोजगाराची संधी मिळणार असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन
केंद्र लातूर यांच्याकडून परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
नोकरी
साठी इच्छूक तरूण युवक युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमुह यांच्या
माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन
केंद्र,लातूर यांच्या तर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार मोहिम अर्थात
“जागेवरच निवड संधी”चे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत “जागेवरच निवड संधी” मोहिम येत्या बुधवारी
दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, लातूर हे कार्यालय वेळोवेळी जिल्हयातील
वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करून, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना
रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक
महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी “जागेवरच निवड संधी” मोहिम आयोजित करण्याचा
निर्णय घेण्यात आला आहे. त्यात 1. क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि. लातूर मध्ये फिल्ड ऑफिसर
पदांच्या 10 जागा पात्रता 10 वी, 12 वी व ग्रॅज्युएट 2. भारतीय एअरटेल लि. लातूर मध्ये
कस्टमर रिलेशनशिप ऑफिसर जागा 10 पात्रता कोणतीही पदवी (एम.बी.ए. प्राधान्य) या पात्रतेच्या
उमेदवारांच्या तात्काळ नोकरभरतीची गरज असलेल्या कंपन्यांचे प्रतिनिधी उमेदवारांच्या
थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष मुलाखत देऊन पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना
लगेचच नोकरीची संधी मिळेल.
महास्वयंम
पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवारी दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र,
जिल्हा क्रिडा संकुल मध्ये जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालया समोर, लातूर, येथे स्वखर्चाने
मुलाखतीकरीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्वत:चा रिझ्युम/बायोडाटा/पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे. व या सुवर्ण संधीचा लातूर जिल्हयातील
जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी लाभ घ्यावा. असे आवाहन बा.सु.मरे
सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन
केंद्र, लातूर यांनी केले आहे.
अधिक
माहिती करीता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र,लातूर या
कार्यालयाच्या 02382-299462 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांच्याकडून
सांगण्यात आले आहे .
****
Comments
Post a Comment