महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी, कर्मचारी यांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव

 

महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनी

जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी,

कर्मचारी यांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव


लातूर दि.1 ( जि.मा.का )  महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनी राष्ट्रध्वज वंदन व संचालनानंतर आयोजित विशेष समारंभात जिल्ह्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. तसेच यावेळी विविध विभागात अनुकंपाखाली घेतलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा आदेश जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले.

इंडियन नॅशनल सायन्स काँग्रेस नवी दिल्ली या संस्थेचा यंग रिसर्चर अवॉर्ड -23, द इको इनोवेशन अवॉर्ड, लाईफ टाईम ॲच्युमेंट अवॉर्ड पर्यावरण व जलसंरक्षण या क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन अधिकारी रामदास कोकरे यांना शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.


वेंगुर्ला नगर परिषद जिल्हा सिंधुदुर्ग येथे त्यांनी राबविलेल्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाची दखल घेवून या प्रकल्पाचा समावेश सीबीएससीच्या इय्यता सहावीच्या विज्ञान तसेच महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावी पर्यावरण शिक्षणा व जलसुरक्षा पाठ्यपुस्तकात करण्यात आलेला आहे.

यावेळी जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. ग्रामीण विकासात लातूर जिल्हा परिषदेकडून उत्कृष्ट काम करण्यात येत आह. त्यात डी.बी.गिरी यांचे विशेष योगदान आहे.




उपविभागीय कार्यालय, लातूर अतंर्गत हणमंतवाडी ता. लातूर येथील पोलीस पाटील भाऊसाहेब सपाटे  यांचा प्रशस्तीपत्र सत्कार करण्यात आला.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील ॲड. सुजाता माने (केंद्रे) यांना महिला व बालविकास क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरीबद्दल महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2017-2018 चा पुरस्कार शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह आणि पुरस्काराचा धनादेश प्रदान करण्यात आला.

1 एप्रिल, 2022 ते 31 मार्च, 2023 या कालावधीसाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यकमातंर्गत लातूर जिल्ह्यासाठी 16 हजार 957 मोतिबिंदु शस्त्रक्रियेचे वार्षिक उद्दिष्टे देण्यात आले होते. परतु, लातूर जिल्ह्याने 23 हजार 506 मोतीबिंदु शस्त्रक्रिया करुन 138.92 टक्के काम पूर्ण केले आहे. राज्यात चौथा क्रमांक प्राप्त झाला आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय, लातूर समान्य रुग्णालय अहमदपूर या संस्थांनी सहभाग नोंदवला, तसेच अशासकीय स्वंयसेवी रुग्णलये व खाजगी रुग्णालये यांनीसुध्दा हे उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे. तसेच डॉ. एस.जी. पाठक व त्यांच्या चमुने 4 हजार 41 मोतीबिंदु शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाअंतर्गत जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक तथा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीचे डॉ. श्रीधर पाठक यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या नवजेस्वीनी कार्यक्रमांतर्गत सन 2022-2023 या वर्षाच्या नियोजनाप्रमाणे जेडर सेन्सीटिव्ह रोल मॉडेल अवॉर्ड हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये महिलांच्या सक्षमीकरण विकासाकरिता पुढाकार घेत असलेल्या तसेच समाजात स्त्रीयांना समानतेने वागविणाने व महिलांना माणूस म्हणून अधिकारी जपणाऱ्या सुधारक सन्मानाकरिता निवड करुन उत्कृष्ट तीन पुरुषांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली. यात नागोराव पवार, संग्राम काचे,              श्री. पाटोळे यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

पोलीस विभागामार्फत पोलीस उपनिरीक्षक शेख अय्युब गफुरसाब, महेश पारडे (पोहेकॉ 130), खर्रम इक्तेसाद काझी (पोहेकॉ 546), सदानंद योगी (पोहेकॉ 824), अनंत शिंदे (पोहेकॉ 285) आणि परमेश्वर ढेकणे (पोना 1331) प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून, सेवेत दाखल झाल्यापासून आज पावेतो सेवेत सातत्य दाखवून उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी केलेल्या मा. पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह (डी.जी. इनसीगनीया) 3211 पदक प्राप्त झाले आहे.  तसेच सलमान अब्दुल खदीर नबीजी (पोकॉ/ 988) यांना राष्ट्रीय स्तरावरील खेळात विशेष प्राविण्य दाखविल्याबद्दल पोलीस महासंचालक यांचे  सन्मानचिन्ह (डी.जी. इनसीगनीया) पदक प्राप्त झाल्याबद्दल गौरविण्यात आले.

शहरातील गरोदर मातांना प्रसुतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करणे व प्रसती पश्चात घरी सोडणे यासाठी असलेला जननीरथ हा उपक्रम उत्कृष्टरित्या राबविल्याबद्दल महानगरपालिकेतील निवासी वैद्यकीय अधिकारी (मानधन) डॉ. महेश पाटील यांना पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा