जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिसन राऊत यांची जालना येथे बदली

 

जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिसन राऊत यांची जालना येथे बदली

 

लातूर,दि.28(जिमाका):-जिल्हा कोषागार कार्यालय,लातूर येथील जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिसन राऊत यांची जालना येथे स्थानिक निधी सेवा परिक्षण कार्यालयात सहायक संचालक पदावर येथे बदली झाली आहे. बदलीच्या पदावर रुजू होण्यासाठी 27 एप्रिल, 2023 रोजी कोषागार कार्यालयात त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी अप्पर कोषागार अधिकारी एन.ई.बुध्दीवंत, उपकोषागार अधिकारी आर.के. कलवले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अप्पर कोषागार अधिकारी के.एन. खोजे, वा.अ. सय्यद, बी.टी. शिखरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

याप्रसंगी लातूर जिल्हा कोषागार अधिकारी, पदाचा कार्यभार अप्पर कोषागार अधिकारी संतोष धुमाळे यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लेखापाल जी.एन. गोपवाड यांनी केले.

                                      


 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन