सामाजिक न्याय विभागाची कार्यशाळा निलंगा तालुक्यातील हंद्राळ येथे संपन्न

 

सामाजिक न्याय विभागाची कार्यशाळा

निलंगा तालुक्यातील हंद्राळ येथे संपन्न

 

लातूर,दि.25(जिमाका):आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक 1 एप्रिल, 2023 ते दिनांक 1 मे, 2023 या सामाजिक न्याय पर्व अभियानातंर्गत सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यशाळा आयोजित करुन योजनांचा प्रचार व प्रसिध्दी करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

सदर निर्देशाच्या अनुषंगाने प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेतंर्गत निवड केलेल्या मौजे हंद्राळ येथे दिनांक 20 एप्रिल, 2023 रोजी सायंकाळी 7-00 वाजता अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व ज्येष्ठ नागरिक कायद्याविषयी तसेच समाजिक न्याय विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये समाज कल्याण कार्यालयातील भगवान केंद्रे, संदेश घुगे, शिवाजी पांढरे, बालाजी चव्हाण व ज्येष्ठ नागरिक एल्डर हेल्पलाईनचे (लातूर व धाराशिव) समन्वयक अक्षय सांळुके हे उपस्थित होते. तसेच हंद्राळ येथील सरपंच श्रीमती.लक्ष्मीबाई शिंदे, ग्रामसेवक कार्तीक माळी व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रस्ताविक संदेश घुगे यांनी केले.

समाज कल्याण निरीक्षक भगवान केंद्रे यांनी समाज कल्याणतंर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची, अनुसूचित जातीतील महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना तसेच अनुसूचित जातीतील व नवबौध्द घटकांतील कुटूंबांना रमाई आवास योजनेची माहिती दिली. तसेच सामाजिक न्याय विभागातंर्गत येणाऱ्या कन्यादान, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अशा प्रभावकारी योजनांची माहिती दिली.

या योजनांमुळे अनुसूचित जातीच्या लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना कशा प्रभावी ठरतात याबाबत मार्गदर्शनही केले.

समाज कल्याण निरीक्षक संदेश घुगे यांनी नाहसंअंतर्गत येणाऱ्या, ज्येष्ठ नागरिक कायद्याविषयी व जादुटोणाविरोधी कायदा व अंधश्रध्दा निर्मुलन कायद्याविषयी माहिती दिली. तसेच ज्येष्ठ नागरिक एल्डर हेल्पलाईन ही देशात सुरु करण्यात आलेली आहे. याबाबत सखोल माहिती सांगितली. मौजे हंद्राळ ता. निलंगा येथील नागरिकांचा सदर कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेचे शेवटी शिवाजी पांढरे यांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कायद्याविषयी माहिती सांगून कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. व कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.

                                        ****

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा