लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस गारपीट होण्याचे हवामान विभागाचे संकेत
लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस
गारपीट होण्याचे हवामान विभागाचे संकेत
▪️ शेतकरी व नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
लातूर, दि. 5, (जिमाका): 6 एप्रिल, 2023 रोजी लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि दिनांक 7 एप्रिल, 2023 रोजी मेघगर्जना, वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय , लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व शेतकरी , नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी 3 ते 7 या वेळेत शेतीची व इतर कामे करू नयेत,कारण या कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता अधिक असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली,पाण्याच्या स्रोताजवळ/विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. जलसाठ्याजवळ / नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर / नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये. शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे, पुलावरून / नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल / नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. काढणीसाठी ठेवलेली पिके सुरक्षितपणे झाकून ठेवावी. पाउस सुरु असताना विजेच्या तारा / जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी.असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment