जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास 15 मे पर्यंत मुदतवाढ

 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास 15 मे पर्यंत मुदतवाढ

 

लातूर,दि.27(जिमाका): जिल्ह्यात कार्यरत असलेल्या युवक-युवती व नोंदणीकृत संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा आणि युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील युवक, युवती तसेच नोंदणीकृत संस्थाना  जिल्हा युवा पुरस्कार दिला जातो.सन 2019-20,2020-21,2021-22,2022-23 या चार वर्षाच्या  जिल्हा युवा पुरस्कारासाठी यापूर्वीच अर्ज मागविण्यात आले होते. या पुरस्कारासाठी केवळ एक अर्ज प्राप्त झाल्यामुळे अर्ज सादर करण्यास  15 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

अर्जाचा विहीत नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावा.  अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, (मो.नं.9975576600) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

                                                                 ***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा