सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी लातूर जिल्ह्यात "शासकीय योजनांची जत्रा", जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु

 

सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी लातूर जिल्ह्यात

"शासकीय योजनांची जत्रा", जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरु

 


लातूर दि.26 (जिमाका) जिल्ह्यात विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी " शासकीय योजनांची जत्रा"चे आयोजन करायचे असून त्या दृष्टीने सर्व विभागाने तयारी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या.

   जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांच्या सोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अमोल शिंदे हे दूरदृश्य प्रणाली द्वारे तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, नगर प्रशासन अधिकारी रामदास कोकरे,विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


"शासकीय योजनांची जत्रा" या विशेष कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग सहभागी होणार असून यात अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.    यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात येणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तालुकापातळीपर्यंत याचे नियोजन केले जाणार असल्याचेही यांनी यावेळी नमूद केले.

   लोक कल्याणाचे ध्येय समोर ठेवून शेवटच्या गरजू पर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचावा यासाठी 'शासकीय योजना सुलभीकरण अभियान ' राबविण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार असून त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी राज्यात " "शासकीय योजनांची जत्रा " हा विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु