लहान मुलांच्या आरोग्याचा पहिला विमा म्हणजे लसीकरण..
लहान मुलांच्या आरोग्याचा
पहिला विमा म्हणजे लसीकरण..
लातूर,
दि. 26 (जिमाका): लसीकरण हा बाळाच्या संगोपनातला महत्त्वाचा घटक आहे. बालमृत्यू कमी करण्याचा
हा एक खात्रीचा व अत्यंत सोपा असा मार्ग आहे. नवजात बालकांची प्रतिकार शक्ती कमी असते,
अशा कमजोर शरीराला आजार लगेच विळखा घालतात. अशावेळी आवर्जुन बाळाचे लसीकरण करावे,
असे आवाहन जिल्हा आरोग्य् प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लसीकरण हे ठराविक घातक आजारांसाठी केले जाते. त्या
आजाराची लस घेतल्याने बाळ त्या आजारापासून सुरक्षित राहते.
म्हणून अजिबात न चुकता ठराविक काळाने डॉक्टरांच्या
सल्ल्याने बाळाचे लसीकरण करावे.
कधी कधी आई वडील बाळाला लसीकरण करायचे विसरून जातात
किंवा सारखा सारखा हॉस्पिटलला जायचा कंटाळा करतात. पण असे करणे चूक आहे कारण या गोष्टी
बाळाच्या जीवावर बेतू शकतात. म्हणून या लसी बाळाला आवर्जुन देणे का गरजे आहे...
मूल जन्माला आल्यापासून त्याच्या वयाच्या सोळा वर्षापर्यंत
वेगवेगळ्या प्रकारच्या लसीकरणाचे वेळापत्रक असते.. जागतिक आरोग्य संघटना आणि विविध
देशांच्या आरोग्य मंत्रालयांनी याबाबत आपल्या देशात नियम केले आहेत ..
*लसीकरण म्हणजे काय व कशासाठी...*
आपण सतत विषाणू, जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीवांच्या
संपर्कात असतो. हे जीव विविध रोगांना कारणीभूत
ठरतात.. ज्यामुळे गंभीर आजार, अपंगत्व किंवा मृत्यू देखील होऊ शकतो.
लस आपल्या रोगप्रतिकारक प्रणालीला संक्रमणांशी जलद
आणि अधिक सामर्थ्यवानपणे लढण्यासाठी मदत करतात... लसीकरण केल्यावर, ते रोगप्रतिकारक
शक्तीला उत्तेजित करते, अशा प्रकारे शरीराला विषाणूचा सामना करण्यास सक्षम करते आणि
भविष्यात आक्रमण झाल्यास त्यावर हल्ला देखील करते. ...
लस थोड्या प्रमाणात मृत किंवा कमकुवत जंतूंपासून
तयार केल्या जातात, परंतु त्यांमुळे कोणतेही
नुकसान होण्याची किंवा आजारी पडण्याची शक्यता नसते....कधी कधी सौम्य स्वरूपात आजाराची
लक्षणे दिसून येतात..प्रतिकूल दुष्परिणामांच्या शक्यतेशिवाय लस विशिष्ट संक्रमणांना
दीर्घकाळ प्रतिकारशक्ती देतात..तसेच
कळप प्रतिकारशक्तीचा (Herd immunity)फायदा सर्वांना
मिळतो...त्यामुळे तुमचे लसीकरण वगळू नका....
लसीकरण हे विविध सरकारी संस्थांमध्ये मोफत पणे दिले
जाते तर सर्व जनतेला असे आवाहन आहे की याचा सर्वांनी लाभ घ्यावा व आपल्या बाळाचे आरोग्य
सुरक्षित ठेवावे... काही लसी या ऐच्छिक असतात ..अशा ऐच्छिक लसी पेशंटच्या गरजेनुसार सरकारी दवाखान्यामध्ये किंवा
खाजगी दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहेत.. त्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन बालरोग
विभाग, वि.दे. वै.म. व रुग्णालय, याचे विभाग प्रमुख डॉ. शिवप्रसाद मुंदडा सर यांनी
केले आहे.
****
Comments
Post a Comment