13 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजदिन निधी शुभारंभ कार्यक्रम

सुधारित 


13 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजदिन निधी शुभारंभ कार्यक्रम


लातूर,दि.11:  ध्वजदिन निधी संकलनचा शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक बोर्डाच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली 13 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता होत आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, विधवा व शौर्य पदकधारक यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शरद प्रकाश पांढरे (निवृत्त) यांनी केले आहे.


**

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास