उंबडगा खु. येथे कुक्कुटपालन व शेळीपालन प्रशिक्षणाला प्रतिसाद

 

उंबडगा खु. येथे कुक्कुटपालन व शेळीपालन प्रशिक्षणाला प्रतिसाद

लातूर, दि. 27 (जिमाका) :  कुकूट प्रशिक्षण मुरुड ता. जि. लातूर व ग्राम पंचायत कार्यालय खुर्द ता. औसा जि. लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने कुक्कूटपालन  व शेळीपालन प्रशिक्षण शिबीर उंबडगा खु
. येथे पार पडले. प्रशिक्षणाचे लाभ घेवून युवकांनी कुक्कूटपालन व शेळी पालन व्यवसाय मुख्य व्यवसाय करण्याचे  आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेशसिंह बायस यांनी केले.

या शिबीरात शेळीपालन व कुक्कूटपालन याबाबत विविध विषयांवर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुधाकर साळवे, डॉ. शिवाजी क्षीरसागर, डॉ. कृष्णा पांडे, डॉ. राघवेंद्र पडगलवार तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. शिवानंद मुक्कनवार, डॉ. अमर चाटे, डॉ. गणेश निटुरे, डॉ. दिपक मुळे यांनी मार्गदर्शन केले.

सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी भोकरंबा येथील बालाजी गोट फार्म या प्रक्षेत्रास भेट दिली. येथे सर्व प्रशिक्षणातील प्रात्यक्षिक माहिती व विविध शासकीय योजना याबाबत माहिती डॉ. योगेशसिंह बायस यांनी माहिती दिली. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी किरण कोळपे, बळीराम मोर, पाटील येळी, श्री. गोमारे व सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

**** 


Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित