सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत लातूर दि. 13 : “ ई ” वर्गातील संस्था म्हणजेच 250 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी 20 ते 31 जानेवारी, 2025 या कालावधीकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यात येणार आहे. यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज शासकीय विभागातील (सहकार विभागातील कार्यरत अधिकारी, कर्मचारी वगळून), स्थानिक स्वराज्य संस्थेतील, सहकारी संस्थेतील कायम कार्यरत अधिकारी, कर्मचारी (वरीष्ठ लिपीक किंवा त्यापेक्षा जादा दर्जा असलेल्या कर्मचारी), प्रमाणित लेखापरीक्षक , वकील (पाच वर्षाचा कामाचा अनुभव), शासकीय सेवेतून, स्थानिक स्वराज्य संस्थेतून सेवानिवृत्त झालेला अधिकारी, कर्मचारी (वयाची 65 वर्ष पेक्षा जास्त नसलेल्या) यांच्याकडून मागविण्यात आले आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज 20 ते 31 जानेवारी, 2025 या कालावधीत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) लातूर,बीड, नांदेड व धाराशिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत मिळू शकत...
Comments
Post a Comment