माजी सैनिक विश्रामगृह येथील अशासकीय माळी पद तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार

 

माजी सैनिक विश्रामगृह येथील

अशासकीय माळी पद तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार  

लातूर,दि.16:-  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या आस्थापनेवरील माजी सैनिक विश्रामगृह, मल्टिपरपज हॉल येथे अशासकीय माळी पद तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधन प्रतिमहा 13 हजार 89 रुपये प्रमाणे भरण्यात येणार आहे.

ज्यांना माळी कामाचा अनुभव असेल अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छूक माजी सैनिक व इतर पुरुष उमेदवारांनी आपला अर्ज व सर्व मूळ कागदपत्रासह मुलाखतीसाठी 24 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे स्वत: उपस्थित रहावे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार आहे, असे  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि) यांनी कळविले आहे.

***

 

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित