लातूर जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक 18 जून 2025 रोजी

 लातूर जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक 18 जून 2025 रोजी


लातूर, दि. 16 (जिमाका):  जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक 18 जून 2025 रोजी दुपारी 4 वाजता लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहतील.

शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचारासंबंधी तक्रारी असणाऱ्या नागरिकांना आवश्यक पुराव्यासह, स्वत:च्या नावाने आणि अचूक पत्त्यासह तक्रार अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदारांनी बैठकीत समितीसमक्ष उपस्थित राहून आपले अर्ज सादर करावेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास