दिव्यांग सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२५ साठी अर्ज करण्याचे आवाहन
लातूर, दि. २५ : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात येतात. या अंतर्गत २०२५ या वर्षासाठी पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि दिव्यांग क्षेत्रातील संस्थांनी १५ जुलै २०२५ पर्यंत www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
हे पुरस्कार वैयक्तिक पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना तसेच दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांना प्रदान केले जाणार आहेत. पुरस्कारांची सविस्तर माहिती www.depwd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वैयक्तिक पुरस्कार श्रेणी-
सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन
श्रेष्ठ दिव्यांगजन
श्रेष्ठ दिव्यांग बाल/बालिका
दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी कार्यरत श्रेष्ठ व्यक्ती
दिव्यांगता क्षेत्रात कार्यरत श्रेष्ठ पुनर्वास व्यावसायिक
दिव्यांगता क्षेत्रातील श्रेष्ठ संशोधन, नवप्रवर्तन किंवा उत्पादन विकास
संस्थांसाठी पुरस्कार श्रेणी-
दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी कार्यरत सर्वश्रेष्ठ संस्था
दिव्यांगजनांसाठी सर्वश्रेष्ठ नियोक्ता
दिव्यांगजनांसाठी सर्वश्रेष्ठ प्लेसमेंट एजन्सी
सुगम्य भारत अभियानाच्या अंमलबजावणीत किंवा बाधामुक्त वातावरण निर्मितीत सर्वश्रेष्ठ राज्य/केंद्रशासित प्रदेश/जिल्हा
सर्वश्रेष्ठ सुगम्य यातायात साधन किंवा माहिती व संचार तंत्रज्ञान
दिव्यांगजन अधिकार अधिनियम, विशिष्ट दिव्यांगता ओळखपत्र आणि सशक्तीकरण योजनांच्या अंमलबजावणीत सर्वश्रेष्ठ राज्य/केंद्रशासित प्रदेश/जिल्हा
दिव्यांगजन अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणीत सर्वश्रेष्ठ कामगिरी करणारे राज्य दिव्यांगजन आयुक्त
पुनर्वसन सेवांसाठी व्यावसायिक तयार करणारी सर्वश्रेष्ठ संस्था
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांनी १५ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांनी केले आहे.
*****
मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन लातूर, दि. १६ : मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाशी संबंधित व्यक्ती व संस्थांनी 'राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म' (एनएफडीपी) पोर्टलवर आपली नोंदणी करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती तेजस्विनी सिंधू प्रदीप करळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व वैयक्तिक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्य विक्रेते, मच्छिमार सहकारी संस्थांचे सभासद आणि मत्स्यउत्पादन शेतकरी संघ यांना विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलवर नोंदणी असणे अनिवार्य आहे. ही नोंदणी https://nfdp.dpf.gov.in किंवा https://pmmkssy.dof.gov.in या लिंकवर स्वतः किंवा जवळच्या 'सीएससी' केंद्रात जाऊन विनामूल्य करता येईल. नोंदणीसाठी ओळखपत्र आणि बँक पासबुक सोबत असणे आवश्यक आहे. यासोबतच, ई-श्रम कार्डसाठीची नोंदणी https://eshram.gov.in या लिंकवर करावी. तसेच अपघात गट विमा नोंदणीबाबतची ३३ कॉलमची माहिती आणि 'केसीसी' संदर्भातील कागद...
Comments
Post a Comment