लातूर जिल्हा कोषागार कार्यालयाचा ब्लॉग;

विभाग प्रमुख, निवृत्तीवेतनधारकांसाठी ऑनलाइन माहिती सुविधा
• ब्लॉगच्या माध्यमातून घरबसल्या मिळणार माहिती

लातूर, दि. 18 (जिमाका): लातूर जिल्हा कोषागार कार्यालयाने शासकीय विभाग प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी, निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांच्या सुविधेसाठी https://laturtreasuryoffice.blogspot.com या ब्लॉगची निर्मिती केली आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून कोषागाराशी संबंधित माहिती सुलभ आणि सहज उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्वला पाटील यांनी सांगितले.

या ब्लॉगची संकल्पना डॉ. उज्वला पाटील यांची असून, संकेतस्थळ मांडणी उपकोषागार अधिकारी (संगणक) आर. डी. माने यांनी केली आहे. ब्लॉग निर्मितीचे मार्गदर्शन अपर कोषागार अधिकारी (संगणक) ख. ना. खोजे यांनी केले.

या ब्लॉगवर डीडीओ सूचना, बील पोर्टल, ग्रास, एनपीएस, एसबीआय सीएमपी फास्ट प्लस, ई-कुबेर, सीएमपी रजिस्ट्रेशन, बीम्स, व्हीपीडीए, निवृत्तीवेतन, कोषवाहिनी, सेवार्थ, वेतनिका, महालेखापाल नागपूर, शासन निर्णय, जीईएम पोर्टल, शासकीय प्रकाशने, आयगॉट कर्मयोगी, नागरिकांची सनद, एम्प्लॉई कॉर्नर, बिल व्हेरिफिकेशन, डाऊनलोड, कार्यालयीन आदेश/परिपत्रके, संगणकीय प्रशिक्षण, ऑनलाइन सीआर, ई-टपाल लिंक, जीआयएस कॅल्क्युलेटर, आयकर माहिती आदी टॅब उपलब्ध आहेत. यामुळे आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना एकाच व्यासपीठावर सर्व आवश्यक माहिती आणि लिंक मिळतील.

जिल्ह्यातील विभाग प्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी, निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंबनिवृत्तीवेतनधारकांनी या ब्लॉगला भेट देऊन माहितीचा लाभ घ्यावा, तसेच अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन लातूर जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे.

*****


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत