सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण

 सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण

            लातूर, दि. 12 : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आवाहनानुसार 10 जून 2025 रोजी लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात आणि समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

            सामाजिक न्याय भवन परिसरात आयोजित कार्यक्रमात लातूर आयएमए महिला विंगच्या डॉ. ज्योती सुळ आणि इतर महिला डॉक्टर, लातूर वृक्ष चळवळ, तसेच सह्याद्री देवराई चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी 16 वडाच्या झाडांचे रोपण करण्यात आले, तसेच उपस्थित 31 महिलांना वडाची रोपे भेट देण्यात आली. याशिवाय, समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त 25 शासकीय वसतिगृह आणि 6 निवासी शाळांमध्येही महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

            समाज कल्याण सहायक आयुक्त विलास केंद्रे उपस्थितांचे आभार मानले. सह्याद्री देवराई चळवळीचे समन्वयक सुपर्ण जगताप, डॉ. ज्योती सुळ, ज्येष्ठ नागरिक संघाचे डॉ. बी.आर. पाटील, तसेच सामाजिक न्याय भवनातील विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास

निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत