लातूर जिल्ह्यातील खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशाची संधी

 लातूर जिल्ह्यातील खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशाची संधी

लातूरदि. 17: महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत 2025-26 साठी पुणेकोल्हापूरठाणेअमरावतीनाशिकअकोलानागपूरछत्रपती संभाजीनगर आणि गडचिरोली येथील क्रीडा प्रबोधिनींमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामध्ये हॅण्डबॉलजलतरणसायकलिंगफुटबॉलज्युदो आणि जिम्नॅस्टिक्स या खेळांसाठी निवासी आणि अनिवासी प्रवेश 26 ते 27 जून 2025 दरम्यान 50 टक्के लेखी चाचणी आणि 50 टक्के कौशल्य चाचणीच्या आधारे दिले जाणार आहेत.

            राज्यस्तरावर पदकप्राप्त किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व केलेले 19 वर्षांखालील खेळाडू तज्ज्ञ समितीसमोर चाचणी देऊन सरळ प्रवेशासाठी पात्र ठरतील. राज्यस्तरावर सहभागी 19 वर्षांखालील खेळाडूंना खेळनिहाय कौशल्य चाचणीत गुणानुक्रमे प्रवेश निश्चित होईल. जुलै 2006 नंतर जन्मलेले आणि जुलै 2025 पर्यंत 19 वर्षे पूर्ण झालेले खेळाडू प्रवेशास पात्र आहेत.

            क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशासाठी इच्छुक लातूर जिल्ह्यातील खेळाडूंनी 24 जून 2025 पर्यंत मूळ क्रीडा प्रमाणपत्रासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयलातूर येथे कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी जयराज मुंढे (भ्रमणध्वनी क्र. 8275273917) किंवा क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत लोदगेकर (भ्रमणध्वनी क्र. 9834988239) यांच्याशी संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित