मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती

 मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती

लातूरदि. 17: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील मांगमातंगमिनी मादीगमादींगादानखणी मांगमांग महाशीमदारीराधे मांगमांग गारुडीमांग गारोडीमादगीमादिगा या 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी 2024-25 शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वीपदवीपदव्युत्तरवैद्यकीय व अभियांत्रिकी परीक्षेत 60 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 2025 मध्ये गुणानुक्रमे प्रथम ते विद्यार्थ्यांना निधी उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी 20 जुलै 2025 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळजिल्हा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनडाल्डा फॅक्टरीशिवनेरी गेट समोरलातूर येथे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. अर्जासोबत जातीचा दाखला (छायांकित प्रत)रेशन कार्ड (छायांकित प्रत)आधार कार्ड (छायांकित प्रत)शाळेचा दाखला (छायांकित प्रत)2025 च्या गुणपत्रिकेची छायांकित प्रतपुढील वर्षाच्या प्रवेशाची पावती (छायांकित प्रत)दोन पासपोर्ट फोटो जोडावेत. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करून शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित