महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत

 महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी १५ जूनपर्यंत मुदत

लातूरदि. १० (जिमाका): शिष्यवृत्तीसाठी सन २०२३-२४ साठी रि-अप्लाय आणि सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी नवीन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू झाले आहे. जिल्ह्यातील शासनमान्यअनुदानितविनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीशिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क फ्रिशीपराजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेता येईल.

८ जानेवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्कविद्यापीठाद्वारे आकारले जाणारे इतर शुल्क आणि शैक्षणिक विभाग तसेच शासकीय यंत्रणांकडून घ्यावयाची मंजुरी याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य आणि लिपिक कर्मचारी यांच्यावर आहे. महाविद्यालयांनी समान संधी केंद्रामार्फत विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करावे.

सर्व प्राचार्यकर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अर्ज अचूक भरून १५ जून २०२५ पूर्वी ऑनलाईन सादर करावेत. अर्ज प्रलंबित राहिल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य आर्थिक जबाबदारीस पात्र राहतीलअसे लातूरचे समाज कल्याण सहायक आयुक्त यांनी स्पष्ट केले.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास