लातूर येथील माजी सैनिकी मुलांचे वसतिगृहात अशासकीय माळी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लातूर येथील माजी सैनिकी मुलांचे वसतिगृहात अशासकीय माळी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन लातूर, दि. 24: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या आस्थापनेवरील लातूर येथील माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे अशासकीय माळी पद तात्पुरत्या स्वरूपात एकत्रित मानधन प्रतिमाहा रक्कम 13 हजार 89 रुपये प्रमाणे भरण्यात येणार आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक व नागरी जीवनातील पुरुष यांना या पदासाठी अर्ज करता येतील. माळी कामाचा अनुभव असेल अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. इच्छुक माजी सैनिक व नागरी जीवनातील पुरूष उमेदवारांनी आपल्या अर्ज व सर्व मूळ कागदपत्रासह 1 जुलै, 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी लातूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे स्वत: उपस्थित राहावे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारास तात्काळ कामावर घेण्यात येणार आहे, असे ले. कर्नल जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शरद पांढरे, (नि.) यांनी कळविले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत