जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

 जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत

वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

लातूरदि. १० (जिमाका): जिल्हा प्रशासनामार्फत वृक्षारोपण मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वटपौर्णिमेचे औचित्य साधून प्रत्येक कुटुंबाने किमान १० झाडे लावावीतअसे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले होते. वन विभागामार्फत साखरा येथील विलासराव देशमुख वन उद्यानात जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत ५० वडाची रोपे लावून या उपक्रमाला सुरुवात झाली.

रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळसहायक वनसंरक्षक वैशाली तांबेवृक्षारोपण मोहिमेत सहभागी सुनंदा जगतापवनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पोटेश्रीमती नागरगोजेवनपरिमंडळ अधिकारी नीलेश बिराजदारटी. एस. चिल्लेपी. टी. देवकरणवनरक्षक महेश पवारबालाजी पाटीलगोविंद घुलेधम्मसागर कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदाची वटपौर्णिमा वडाची झाडे लावून साजरी करण्यात आली. या उपक्रमाची सुरुवात श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते साखरा येथील विलासराव देशमुख वन उद्यानात वडाचे झाड लावून झाली. यावेळी ५० महिलांनीही वडाची झाडे लावून या झाडांची पूजा केली.

***** 


Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित