लातूर येथील सैनिकी मुलां - मुलींचे वसतिगृह येथे धान्य पुरवठ्यासाठी दरपत्रक पाठवावेत

 लातूर येथील सैनिकी मुलां - मुलींचे वसतिगृह येथे

धान्य पुरवठ्यासाठी दरपत्रक पाठवावेत

   लातूर, दि. 13: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलां-मुलींचे वसतिगृह, सैनिक संकुल, अंबाजोगाई रोड, लातूर येथे अंदाजे प्रतिदिन 100 विद्यार्थ्यांसाठी दरमहा धान्य खरेदी करण्यात येते.

त्याकरिता लातूर जिल्ह्यातील सर्व धान्य विक्रेता, व्यापारी यांनी 1 जुलै, 2025 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीसाठी सर्व धान्याचे कमीत कमी चार महिन्याचे स्थिर भाव दरपत्रक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लातूर यांच्या नांवे दि. 23 जून, 2025 पर्यंत बंद पॉकेटमध्ये सैनिक मुलांचे-मुलींचे वसतिगृह, लातूर येथे सादर करावेत, असे लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी कळविले आहे.

****

Comments