Posts

Showing posts from January, 2026

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी घेतला आढावा लातूर दि. ३१ : जिल्ह्यातील १५२ परीक्षा केंद्रांवर इयत्ता दहावीची आणि १०० परीक्षा केंद्रांवर इयत्ता बारावीची परीक्षा होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी २०२६ पासून तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होत आहे. या परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत पूर्वतयारी सुरु आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी नुकताच या पूर्वतयारीचा आढावा घेवून आवश्यक सूचना केल्या. शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातून ३९ हजार २४२ विद्यार्थी इयत्ता दहावी, तर ३६ हजार ५११ विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहेत. प्रत्येक परीक्षा कक्षात, परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. परीक्षा देत असतांना विद्यार्थ्यांनी काय करावे, काय करू नये, याबाबतच्या सूचना प्रत्येक परीक्षा केंद्राच्या सूचनाफलकावर लावण्यात येणार आहेत. राज्य मंडळामार्फत तयार कर...

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी १ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी १ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा · १८ फेब्रुवारी, २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. ३१ : अनुसूचित व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल शाळांमध्ये प्रवेशासाठी १ मार्च २०२६ रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. पात्र विद्यार्थ्यांकडून या परीक्षेचे अर्ज भरून मुख्याध्यापकांनी संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे १८ फेब्रुवारी, २०२६ पर्यंत सादर करावेत, असे छत्रपती संभाजीनगर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी कळविले आहे. परीक्षेचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. अमरावती आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त एकात्म‍िक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुसद आणि कळमनुरी यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या १२ जिल्ह्यांतील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व म...

लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द लातूर, दि. २९ : रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खत आणि कीटकनाशकांचा पुरवठा होण्यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचलली आहेत. पुणे येथील संचालक (नियंत्रण व गुणनियंत्रण) कृषी आयुक्तालयाच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यात भरारी पथक आणि कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) यांनी कृषी निविष्ठा केंद्रांची तपासणी केली होती. तपासणीदरम्यान काही केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भास्कर कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ८ जानेवारी २०२६ रोजी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत एकूण १७ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. या मध्ये बियाणे विक्रीचे १३, खत विक्रीचे २ आणि कीटकनाशक विक्रीचे २ परवाने रद्द झाले आहेत.तसेच ८ कृषी निविष्ठा केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. साठाफलक व भावफलक प्रदर्शित न करणे, साठा नोंदवही आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत, भावफलक, साठा नोंद अद्ययावत न ठेवणे, विक्री बिलावर शेतकऱ्यांची सही/अंगठा न घेणे, बियाण्यांचा संपूर्ण तपशील बिलात न लिहिणे, उत्पादकाचा स्त्रोत न दर्शविणे, ई-पॉस...

फेब्रुवारी महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित

फेब्रुवारी महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन स्थगित लातूर, दि. २९ : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु, सद्यस्थितीत लातूर जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजवणी सुरु असल्यामुळे ०२ फेब्रुवारी २०२६ रोजीचा लोकशाही दिन स्थगित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. *****

रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पातील पाणी मागणीसाठी ३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

रब्बी हंगामासाठी सिंचन प्रकल्पातील पाणी मागणीसाठी ३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन · घरणी, साकोळ, देवर्जन, रेणापूर, तिरू आणि व्हटी मध्यम प्रकल्पाचा समावेश लातूर, दि. २९ : लातूर पाटबंधारे विभाग क्रं. २ विभाग अंतर्गत घरणी, साकोळ, देवर्जन, रेणापूर, तिरू आणि व्हटी मध्यम प्रकल्प, तसेच ९८ लघु प्रकल्प, साठवण तलाव व बॅरेजस आदी प्रकल्पातील पिण्यासाठी आवश्यक आरक्षित पाणीसाठा वगळता उर्वरित पाणी रब्बी हंगामात सिंचनासाठी देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित पाटबंधारे विभागाच्या शाखा अधिकारी कार्यालयात पाणी मागणी अर्ज सादर करावेत, असे लातूर पाटबंधारे विभाग क्र. २ चे उपकार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे. रब्बी हंगाम २०२५-२६ करिता सर्व सिंचन लाभधारकांनी पाणी अर्ज नमुना ७ व ७ अ शासनाने सुधारित केलेल्या नमुन्यात संबंधित शाखा अधिकारी यांचे कार्यालयात पाणी अर्ज भरून शाखा अधिकारी यांच्या कार्यालयात ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सादर करावेत. तसेच कमी पाण्यात येणारी रब्बी हंगामी पिके प्राधान्याने घ्यावीत. प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचा विचार करता, प्रवाही सिंच...

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 26 जानेवारी रोजी बंद राहणार

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग 26 जानेवारी रोजी बंद राहणार लातूर, दि. 24 (जिमाका) : प्रजासत्ताक दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सोमवार, 26 जानेवारी 2026 रोजी बंद राहील. तसेच मंगळवार, 27 जानेवारी 2026 पासून बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी.) नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील, असे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांनी कळविले आहे. तसेच रुग्णालयाची आपत्कालीन सेवा 24 तास सुरु राहील. *

प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन

प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन लातूर, दि. 23 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार, 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.15 वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन समारंभ होणार आहे. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. या कार्यक्रमास नागरिकांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता, यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा सकाळी 10 वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. ***

लातूर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार ऐतिहासिक कवायत सादरीकरण ▪️सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर गीतावर आधारित कवायत संचलन

लातूर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार ऐतिहासिक कवायत सादरीकरण ▪️सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांचे राष्ट्रभक्तीपर गीतावर आधारित कवायत संचलन लातूर, दि. २३ : जिल्ह्यात २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रभक्तीपर गीतावर आधारित भव्य कवायत सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी जिल्हास्तरीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांचे एकत्रित कवायत संचलन सादर केले जाणार आहे. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होत आहेत. या कार्यक्रमास पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी प्राथमिक तृप्ती अंधारे तसेच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील इतर नऊ तालुक्यांमध्ये देखील ध्वजवंदनानंतर स्वतंत्रपणे कवायत आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शासकीय, खासगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधून विद्या...

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ लातूर, दि. २३ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार २५ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत अधिकारी, कर्मचारी यांनी मतदार जागृतीची शपथ घेतली. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, तहसीलदार संतोष बनकर, नायब तहसीलदार पंकज मंदाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. वयाची अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर मतदार नोंदणी करणे आणि मतदान करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे. या वर्षी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाने 'माझा भारत, माझे मत' ही थीम आणि 'भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी नागरिक' ही टॅगलाइन जाहीर केली आहे. या थीमच्या अनुषंगाने २५ जानेवारी रोजी मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबवावेत, तसेच प्रत्येक पात्र मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा. लातूर जिल्ह्यातील सर्व विभागीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी या राष्ट्रीय उत्सवात सक्र...

लातूर जिल्हास्तरीय गायन स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांनी गीतांमधून मांडला श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जीवनपट

Image
लातूर जिल्हास्तरीय गायन स्पर्धा उत्साहात; विद्यार्थ्यांनी गीतांमधून मांडला श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जीवनपट लातूर, दि. २२ : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त लातूर जिल्हा शिक्षण विभागामार्फत ज्ञानप्रकाश शिक्षण संकुलात ‘हिंद दी चादर’ गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उत्साहाने भाग घेत विद्यार्थ्यांनी गीतांमधून श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनातील त्याग, बलिदान आणि शौर्य यांची प्रभावी मांडणी केली. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांना ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाते, त्यांनी मानवता आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणास लावले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या आदर्शांचा आणि त्यांच्या अमर बलिदानाचा संदेश पोहचला. स्पर्धेत सादर केलेल्या गीतांमधून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा जीवनपट उलगडला गेला. समग्र शिक्षा अभियानचे चंद्रकांत ठाकरे यांनी या स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पहिले. तसेच संगीत शिक्षक विश्वजीत पांचाळ आणि शाहीर श्रीमती अॅड. अपेक्षा डाके यांनी पर...

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ५२ व्या ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करण्याचे आवाहन

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान अंतर्गत ५२ व्या ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 या कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ सादर करण्याचे आवाहन लातूर, दि. 22 : राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकत्ता व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी ‘ ग्रंथभेट’ योजनेतंर्गत सन 2025 या कॅलेंडर वर्षात प्रकाशित झालेली मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ग्रंथ खरेदी करुन राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना भेट म्हणून देण्यात येणार येतात. या योजनेतंर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या ग्रथांची निवड करण्यासाठी तसेच ग्रंथालय स्तरावरुन प्रसिध्द होणाऱ्या ‘ शासनमान्य ग्रंथ निवड यादी’ मध्ये समावेश होण्याच्या दृष्टीने सन 2025 कॅलेंडर वर्षात दि. 1 जानेवारी, 2025 ते दि. 31 डिसेंबर, 2025 प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक विनामुल्य प्रत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे २८ फेब्रुवारी, 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. २८ फेब्रुवारी, 2026 नंतर प्राप्त झालेलया ग्रंथांचा ग्रंथ निवड यादीसाठी विचार केला जाणार नाही. या योजनेसाठी सन 2025 या वर्षात प्रकाशि...

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : प्रधान सचिव श्रीकर परदेशी

हिंद दी चादर शहीदी समागम कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : प्रधान सचिव श्रीकर परदेशी  सर्व जिल्हाधिकाऱ्यांचा घेतला आढावा  हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक नांदेड, दि. 21 जानेवारी:- नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा कार्यक्रम होत आहे. जागतिक स्तरावरील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. सर्व भाविकांची व्यवस्था चोख होईल याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या तयारीचा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल क...

श्री गुरु तेग बहादूर : मानवजातीचे खरे तारणहार

श्री गुरु तेग बहादूर : मानवजातीचे खरे तारणहार ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहिदीला ३५० वर्ष पुर्ण होत असल्याने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम राज्यस्तरीय समिती मार्फत नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी कार्यक्रम होत आहे. या निमित्ताने श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या अनमोल कार्याची ही माहिती... ​महान योद्धा, आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व आणि मातृभूमीचे प्रेमी नववे शीख गुरू श्री गुरु तेग बहादूरजी यांनी केलेल्या सर्वोच्च बलिदानाची मानवता सदैव ऋणी राहील. त्यांनी विश्वबंधुता आणि धार्मिक स्वातंत्र्याचा संदेश दिला. धर्म, मातृभूमी आणि लोकांच्या हक्कांसाठी त्यांनी जाती-धर्माचा विचार न करता सर्वस्वाचा त्याग केला. म्हणूनच त्यांना ‘हिंद दी चादर’ या दुर्मिळ सन्मानाने गौरवण्यात आले. आपण श्री गुरु तेग बहादूरजींचा ३५० वा शहिदी समागम वर्ष साजरा करत असताना, धार्मिक स्वातंत्र्याचे महत्त्व आणि मानवजातीच्या व मातृभूमीच्या कल्याणाविषयी शिकवण देणाऱ्य...

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रम; लातूर जिल्ह्यातील भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन · लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Image
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रम; लातूर जिल्ह्यातील भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन · लातूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा · कार्यक्रमाविषयी जनजागृतीसाठी गावोगावी प्रभात फेरीचे आयोजन लातूर, दि. २१ : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने जाणार असून या अनुषंगाने जिल्ह्यात होत असलेल्या जनजागृती उपक्रमांचा व पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज आढावा घेतला. तसेच पुढील दोन दिवस जिल्ह्यात व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ, उ...

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रम पथनाट्यातून मांडली श्री गुरु तेग बहादूरजींच्या अमर बलिदानाची गाथा

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रम पथनाट्यातून मांडली श्री गुरु तेग बहादूरजींच्या अमर बलिदानाची गाथा · लातूर जिल्हास्तरीय शालेय पथनाट्य स्पर्धेत ३४ विद्यार्थ्यांचा सहभाग लातूर, दि. २१ : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त लातूर जिल्हा शिक्षण विभागामार्फत ‘हिंद दी चादर’ पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून श्री गुरु तेग बहादूरजी यांची जीवनगाथा उभी केली. हा उपक्रम श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या अमर बलिदानाची आठवण करून देणारा आणि धार्मिक सहिष्णुता, मानवतावाद व धैर्याचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविणारा ठरला. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील विविध शाळांमधील ३४ विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला. यामध्ये अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय, औसा तालुक्यातील सेलू येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, भादा येथील जिल्हा परिषद प्रशाला, लामजना येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा यासह इतर शाळात...

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा ३५० वा शहीदी समागम ऐतिहासीक ‘जफरनामा’ची हस्तलिखित प्रत छत्रपती संभाजीनगर येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित

हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांचा ३५० वा शहीदी समागम ऐतिहासीक ‘जफरनामा’ची हस्तलिखित प्रत छत्रपती संभाजीनगर येथील भाई दयासिंग, भाई धरमसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका)- सामाजिक एकोपा, धर्म रक्षणासाठी शहादत देणाऱ्या गुरु तेग बहादुरांना हिंद दी चादर अशी पदवी आहे. त्यांचे जीवन हे समाजाच्या रक्षणासाठी वाहिले. तत्कालीन शास्त्यांकडून समाजावर होत असलेल्या अन्यायपूर्ण वागणुकीचा सामोपचार ज्या पत्राने झाला ते पत्र ‘जफरनामा’ म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. हाच जफरनामा तत्कालिन मुगल बादशाह औरंगजेब यांच्याकडे देण्यासाठी म्हणून छत्रपती संभाजीनगर या शहरात आणला गेला होता. आजही त्याची हस्तलिखित प्रत येथील भाई दयासिंग, भाई हरिसिंग गुरुद्वाऱ्यात संग्रहित आहे. एक प्रकारे मानव मुक्तीचा जाहीरनामा असलेला हा जफर नामा म्हणजे गुरु तेग बहादुर साहेब यांचे सुपूत्र गुरु गोविंद सिंग यांनी मुगल बादशाह औरंगजेबाला लिहिलेले एक पत्र होय. नांदेड येथे येत्या २४ व २५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या हिंद दी चादर गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. देश विदेशातील...
Image
‘स्क्रोलिंग’ थांबलं, इतिहास जागा झाला! गाणं, डॉक्युमेंटरी आणि डिजिटल युगातील संस्कार क्रांती सध्याच्या 'फास्ट फूड', 'इन्स्टा रिल्स'च्या युगात एखादा ट्रेंड किती काळ टिकतो ? फार तर २४ तास! पण, याच डिजिटल जगात ४०० वर्षे जुन्या इतिहासाने आजच्या 'जनरेशन झी'ला (Gen Z) चक्क थांबायला भाग पाडले. निमित्त, सुप्रसिद्ध सुफी गायक डॉ. सतींदर सरताज यांच्या आवाजातील 'हिंद की चादर' या कलाकृतीचे. नांदेडच्या पवित्र मातीत श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा ३५० व्या भव्य शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्र शासन आणि श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी समितीच्या सहकार्याने र्निवैर निर्मित 'हिंद की चादर' डॉक्युमेंटरी (माहितीपट), अन् सरताज यांचे गीत आता केवळ व्हायरल कंटेंट उरला नसून, ती एक 'संस्कारांची डिजिटल चळवळ' बनली आहे. सुरांचा जादूगर : कोण आहेत सतींदर सरताज ? या चळवळीचा चेहरा आणि आवाज आहेत, डॉ. सतींदर सरताज. मूळचे पंजाबचे. सरताज केवळ गायक नाहीत, तर सुफी संगीतातील 'डॉक्टरेट' (Ph.D) आहेत. त्यांच्या गळ्यातून ...

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-२०२६ निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे लातूर, दि. २१ : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. ही निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. निवडणूक काळातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक...

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम

Image
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रम लातूर येथे आयोजित शालेय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लातूर, दि. २० : ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त लातूर जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत शालेय चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड रोडवरील यशवंत विद्यालयात आयोजित या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अब्दुल शेख, यशवंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जाधव या उपस्थित होत्या, तसेच स्पर्धेचे समन्वयक म्हणून चित्रकार शिवाजी हांडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेविषयी नियमांविषयी माहिती दिली. लातूर जिल्ह्यातील सर्व 10 तालुकास्तरीय स्पर्धांमधून निवड झालेले 30 यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षक म्हणून चंद्रशेखर भालेराव व तेजस शेरखाने यांनी काम पहिले. स्पर्धक विद्यार्थ्यांनी यावेळी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित विविध चित्रे रेखाटली. **

लातूर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जागविला गौरवशाली इतिहास

Image
 ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम लातूर, दि. २० :  ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही जिल्हास्तरीय स्पर्धा आज लातूर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा गौरवशाली इतिहास जागविला. तसेच त्यांच्या मानवतावादी कार्याचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार आणि शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती व शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेला माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर, स्पर्धेचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सौताडेकर, परीक्षक डॉ. मकरंद गिरी, दत्ता ओव्हाळ आणि डॉ. उमाकांत चलवदे उपस्थित होते. ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग...

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम लातूर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जागविला गौरवशाली इतिहास

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम लातूर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जागविला गौरवशाली इतिहास लातूर, दि. २० :  ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही जिल्हास्तरीय स्पर्धा आज लातूर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा गौरवशाली इतिहास जागविला. तसेच त्यांच्या मानवतावादी कार्याचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सूचनेनुसार आणि शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती व शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेला माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर, स्पर्धेचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सौताडेकर, परीक्षक डॉ. मकरंद गिरी, दत्ता ओ...

शुर योध्दा राय लखिशा बंजारा…!

शुर योध्दा राय लखिशा बंजारा…! राय लखिशा बंजारा हे मध्ययुगीन भारतातील शूर, दानशूर आणि लोककल्याणासाठी समर्पित असे महान योद्धा होते. त्यांच्या जन्मापासून ते कार्यापर्यंतचा प्रवास हा पराक्रम, त्याग आणि मानवतेचा आदर्श ठरतो. आपले राष्ट्रपती भवन पूर्वाश्रमीचे लखिशा बंजारा यांची ही भूमी आहे. पंजाब मधील खैरपूर तालुका-अलीपूर जिल्हा-मुजफ्फरगड येथे ४ जुलै १५८० रोजी त्यांचा जन्म झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तान मध्ये आहे. वडील गोधु बंजारा वडतिया जाधव व्यवसायाने सिव्हील ठेकेदार होते. आजोबा ठाकूरदास बंजारा वडतिया जाधव योद्धा व कुशल व्यापारी होते. नागैया, हेमा, हरी,सितु,पांडरा,बक्षी, बाला, जवाहर ही मुले तर सितो नावाची मुलगी लखिशा बंजारा यांना होती. १७ नातू व २४ पणतू असा मोठा परिवार होता. १६०८ मध्ये गोराम पवार परिवारातील कांतोबाईसोबत विवाह झाला. लखिशा बंजारा यांना ९९ वर्षे १० महिने एवढे आयुष्य लाभले. नवी दिल्ली येथे रायसिना, मालचा, बाराखांब आणि नरेला ही गावे त्यांनी वसविली आहेत व ८० तांड्याची मालकी होती. राजधानी दिल्लीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली चार गावांची १२३३ एकर जमीन लखिशा बंजारा यांच्या नावाने...

विशेष लेख - भारतीय संस्कृतीचा गौरव- श्री गुरु तेगबहादुर साहिब

विशेष लेख - भारतीय संस्कृतीचा गौरव- श्री गुरु तेगबहादुर साहिब ‘हिंद दी चादर’, म्हणजेच भारतभूमीचे कवच, अशी शीखांचे नववे गुरु तेगबहादुर साहिब यांची जगाला ओळख आहे. गुरु तेगबहादुर साहिब यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेगबहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने नागपुरातील यशस्वी आयोजनानंतर आता नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी रोजी भव्य अशा आध्यात्मिक समागम कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. या निमित्ताने गुरु तेगबहादुर साहिब यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.... सत्याचा मार्ग आणि अहिंसेचे तत्त्व हे भारतीय विचारांचे एक अविभाज्य अंग आहे. हे तत्त्व केवळ शारीरिक हिंसा न करण्याइतपत मर्यादित नसून, अगदी मनातही कोणाबद्दल द्वेष बाळगू नये, असा त्याचा व्यापक अर्थ आहे. भारतीय संस्कृतीने जगाला विविधतेत एकता जोपासण्याचा मंत्रही दिला. ‘एकम सत् विप्रा बहुधा वदंती’ म्हणजेच सत्य एकच आहे, परंतु विद्वान लोक ते वेगवेगळ्या प्रकारे मांडतात, हे ऋग्वेदातील सूत्र भारतीय संस्कृतीतील धार्मिक सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांचा मूळ ...

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे यांचा दौरा

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे यांचा दौरा लातूर, दि.१९ (जिमाका) : राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे हे २१ ते २३ जानेवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीसाठी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांमध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. धाराशिव येथून २१ जानेवारी रोजी रात्री त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम करतील. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. लोखंडे यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची बैठक होईल. यावेळी ते राबविण्यात येणाऱ्या योजनांचा, तसेच आर्थिक दुर्बल घटकांवर केलेल्या खर्चाचा मागील पाच वर्षांचा आढावा व कामाची तपासणी करणार आहे. तसेच अनुसूचित जाती जमातींना प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व कामाची तपासणी, लाड पागे, दलित वस्ती, अण्णाभाऊ साठे सुधार योजना, घरकुल योजना,अनुदानाबाबत तसेच सफाई कर्मचारी टेंडर व सफाई कर्मचाऱ्यांबाबत आढावा घेण्यात येणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजता ला...

विशेष लेख : श्री गुरु तेगबहादूर जी : मानवमूल्यांचा तेजस्वी दीपस्तंभ

Image
जगात समानतेचा विचार हा नेहमीच संघर्षातून पुढे आलेला आहे. जात, धर्म, वंश, भाषा, लिंग, संपत्ती आणि सत्तेच्या आधारावर माणसामाणसांत भेद निर्माण करण्यात आले. अशा असमानतेविरुद्ध आवाज उठवणारे संत, विचारवंत आणि समाजसुधारक इतिहासात विरळाच. शीख परंपरेतील नववे गुरु श्री गुरु तेगबहादूर जी (१६२१–१६७५) हे अशाच महान व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. त्यांनी आपल्या विचारांतून, बाणीतून आणि सर्वोच्च बलिदानातून मानवी समानतेचा विश्वव्यापी संदेश दिला. त्यांच्या 350 व्या बलिदान पर्वानिमित्त त्यांच्या महान कार्याचे स्मरण करणे प्रेरणादायी ठरेल. मानवी समानता म्हणजे सर्व मानव जन्मतः समान आहेत, त्यांच्यात कोणताही उच्च-नीच भेद असू नये, प्रत्येकाला स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि न्याय मिळावा. ही संकल्पना आधुनिक लोकशाही, मानवाधिकार आणि संविधानांची मूलभूत चौकट आहे. मात्र, श्री गुरु तेगबहादूर जी यांनी हा विचार १७ व्या शतकात, जेव्हा समाज कर्मकांड, जातीयता आणि धार्मिक कट्टरतेने ग्रासलेला होता, तेव्हाच प्रत्यक्ष आचरणात आणला. श्री गुरु तेगबहादूर जी यांच्या काळात भारतीय समाज अनेक स्तरांवर विभागलेला होता. त्यात जातीय विषमता, स्त्र...

लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

  लातूर , दि. 19 ( जिमाका) :   कायदा व सुव्यवस्था , सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके   यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) व ( 3)   नुसार   संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी   आदेश   जारी केले आहेत. हा   आदेश   संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत 20 जानेवारी , 202 6 रोजीच्या 00.01 वाजेपासून ते   03 फेब्रुवारी , 202 6 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरुन)   लागू   राहील. शस्त्रबंदी व जमावबंदी   काळात या   आदेशान्वये शस्त्रे , सोटे , तलवारी , भाले , दंडे , बंदुका , सुरे , काठ्या , लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी   वापरता येईल , अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही , दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे , सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहील. व्यक्तीचे प्रेत , आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार न...

लातूर तहसील कार्यालयात उमेदवारांच्या मदतीसाठी कक्ष स्थापन

Image
  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ लातूर , दि. १९ : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने लातूर तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी निवडणूक संबंधित नोडल अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत नामनिर्देशन पत्र स्वीकारणी , माघार , आचारसंहिता अंमलबजावणी , पथके स्थापना आदी बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यासाठी दोनच दिवस शिल्लक असून नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. लातूर तालुक्यातील सर्व उमेदवारांनी वेळेत नामनिर्देशन पत्र सादर करावे व आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे , असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती नऱ्हे-विरोळे यांनी केले. बैठकीस सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सौदागर तांदळे , गट विकास अधिकारी श्याम गोडभरले , नायब तहसीलदार गणेश सरोदे , नायब तहसीलदार सुधीर देशमुख तसेच तहसील कार्यालय व निवडणूक नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र स...