अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे यांचा दौरा

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे यांचा दौरा लातूर, दि.१९ (जिमाका) : राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे हे २१ ते २३ जानेवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीसाठी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांमध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. धाराशिव येथून २१ जानेवारी रोजी रात्री त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम करतील. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. लोखंडे यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता उदगीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची बैठक होईल. यावेळी ते राबविण्यात येणाऱ्या योजनांचा, तसेच आर्थिक दुर्बल घटकांवर केलेल्या खर्चाचा मागील पाच वर्षांचा आढावा व कामाची तपासणी करणार आहे. तसेच अनुसूचित जाती जमातींना प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व कामाची तपासणी, लाड पागे, दलित वस्ती, अण्णाभाऊ साठे सुधार योजना, घरकुल योजना,अनुदानाबाबत तसेच सफाई कर्मचारी टेंडर व सफाई कर्मचाऱ्यांबाबत आढावा घेण्यात येणार आहे. यानंतर दुपारी १२ वाजता लातूरचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या समवेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा व खर्चाचा आढावा घेऊन चर्चा करतील. दुपारी १ वाजता अहमदपूर नगरपरिषद मुख्याधिकारी, दुपारी २ वाजता चाकूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, दुपारी ३.३० वाजता जळकोट नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, सायंकाळी ५ वाजता औसा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता निलंगा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, दुपारी १२.३० वाजता रेणापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, दुपारी २ वाजता शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, सायंकाळी ५ वाजता देवणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची आढावा बैठक घेणार आहेत. यावेळी विविध योजनांचा, तसेच आर्थिक दुर्बल घटकांवर केलेल्या खर्चाचा मागील पाच वर्षांचा आढावा व कामाची तपासणी करणार आहे. तसेच अनुसूचित जाती जमातींना प्राप्त होणाऱ्या निधीबाबत आढावा व कामाची तपासणी, लाड पागे, दलित वस्ती, अण्णाभाऊ साठे सुधार योजना, घरकुल योजना,अनुदानाबाबत तसेच सफाई कर्मचारी टेंडर व सफाई कर्मचाऱ्यांबाबत आढावा घेण्यात येणार आहे. २४ जानेवारी रोजी ते लातूर येथून पुणेकडे रवाना होतील.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत