हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित आयोजित कार्यक्रमांविषयी जिल्ह्यात होणार व्यापक जनजागृती · जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत क्षेत्रीय समिती सदस्यांची बैठक
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित आयोजित कार्यक्रमांविषयी जिल्ह्यात होणार व्यापक जनजागृती
· जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत क्षेत्रीय समिती सदस्यांची बैठक
लातूर, दि. १३ (जिमाका) : हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२५ रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या क्षेत्रीय समितीमधील लातूर जिल्ह्यातील अशासकीय सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या कार्यक्रमाची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, उपजिल्हाधिकारी गणेश पवार, सायली ठाकूर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मठपती, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्यासह अशासकीय सदस्यांची उपस्थिती होती.
नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहावेत, यासाठी जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे. विविध शाळा महाविद्यालयांमध्ये श्री गुरु तेग बहादूर यांच्या जीवनावर आधारित माहितीपट, गीत दाखविण्यात यावे. तसेच ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर या कार्यक्रमाची माहिती पोहचवावी, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या. जिल्हास्तरावर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सोपविण्यात आलेली जबाबदारी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी प्रभावीपणे पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
*****
Comments
Post a Comment