‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर यांचे ३५० व्या शहीदी समागम वर्ष कार्यक्रमाविषयी लातूर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृतीस प्रारंभ
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर यांचे ३५० व्या शहीदी समागम वर्ष कार्यक्रमाविषयी लातूर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृतीस प्रारंभ
लातूर, दि. १६ : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची व श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या कार्याची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत शाळा, महाविद्यालयांमध्ये श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित माहितीपट, गीत दाखविणे यासह विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.
लातूर जिल्ह्यातील शाळांमध्ये आजपासून सुरु झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना शाळेतील एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित माहितीपट आणि गीत दाखविण्यात आले. तसेच काही शाळांमधील विद्यार्थ्यांनी या गीताचे सामूहिक गायन केले. जिल्हा परिषद शाळांसोबतच जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा, यासाठी याविषयावरील चित्रकला, गायन, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन शाळा, महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाईल.
*****
Comments
Post a Comment