पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्ससाठी राज्यस्तरीय निवड चाचण्यांचे आयोजन
वृत्त क्र. १३
पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्ससाठी राज्यस्तरीय निवड चाचण्यांचे आयोजन
लातूर, दि. ०९ : छत्तीसगढ राज्यात निश्चित झालेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स-२०२५-२६ साठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात राज्यस्तरीय निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत फुटबॉल, हॉकी, आर्चरी, ॲथलेटिक्स, जलतरण, वेटलिफ्टिंग आणि कुस्ती अशा ७ खेळप्रकारांचा समावेश आहे. स्पर्धा खुल्या वयोगटात होणार असून अनुसूचित जमाती प्रवर्गातील खेळाडूंची निवड होईल.
राज्यस्तरीय निवड चाचण्यांमधून राष्ट्रीय निवड चाचणीसाठी खेळाडू व संघांची निवड करण्यात येईल, तर राष्ट्रीय स्तरावरून अंतिम स्पर्धेसाठी पात्रता निश्चित होईल. संबंधित खेळ संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनुसार राज्यस्तरीय निवड चाचण्यांचा कार्यक्रम १३ जानेवारी २०२६ रोजी विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. खेळाडूंनी १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत संबंधित ठिकाणी उपस्थित राहावे.
खेळप्रकार व ठिकाणे :
आर्चरी, कुस्ती, वेटलिफ्टिंग : जिल्हा क्रीडा संकुल, तपोवन गेट, अमरावती (संपर्क : श्री. चांदेकर - ९४०४३७९६७७, श्रीमती त्रिवेणी बान्ते - ९९७५५९०२३२, शेख सलीम - ९६५७२७७४५७)
हॉकी : मुळा एज्युकेशन सोसायटी, यश अॅकेडमी, सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर (संपर्क : विशाल गर्जे - ८३६९५३९०७७)
ॲथलेटिक्स : पोलीस ग्राऊंड, पालघर, जि. पालघर (संपर्क : अमृत घाडगे - ९८७००४८६४९)
जलतरण : शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे (संपर्क : बालाजी केंद्रे - ९५०३५४८९८८)
फुटबॉल : विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, कोराडी रोड, नागपूर (संपर्क : अनिल बोरावार - ९४२२१५९०८३)
सहभागी खेळाडूंनी अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र आणि मूळ आधारकार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे. सहभाग स्वखर्चाने असून फक्त खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था करण्यात येईल. खेळाडूंनी स्वतःचे क्रीडा साहित्य व संरक्षक साधने सोबत आणावीत. १२ जानेवारी २०२६ पूर्वी संपर्क प्रमुखांकडे नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे.
वैयक्तिक खेळांमध्ये आर्चरीत प्रत्येक बाबीसाठी प्रथम ३, तर कुस्ती, ॲथलेटिक्स, जलतरण, वेटलिफ्टिंगमध्ये प्रथम २ खेळाडू राष्ट्रीय निवड चाचणीसाठी पात्र ठरतील. हॉकी व फुटबॉलमध्ये एक उत्कृष्ट संघ निवडला जाईल. राज्यस्तरीय चाचणीत सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार नाही; फक्त पात्र खेळाडू/संघ राष्ट्रीय स्तरासाठी पात्र ठरतील. जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी वरील कार्यक्रमानुसार सहभागी होण्याचे आवाहन आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
****
Comments
Post a Comment