पुणे सैनिक कल्याण विभागात लिपीक टंकलेखक (गट-क) पदाची भरती

वृत्त क्र. ०५ पुणे सैनिक कल्याण विभागात लिपीक टंकलेखक (गट-क) पदाची भरती लातूर दि. 02 : सैनिक कल्याण विभागातील लिपीक टंकलेखक (गट-क) सरळसेवा पदभरती जाहिरात 4 नोव्हेंबर, 2025 व शुध्दीपत्रक 12 डिसेंबर, 2025 विभागाच्या संकेतस्थळावर रोजी प्रसिध्द झाली आहे. अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरतीसाठी वेबलिंक देण्यात आली आहे. परंतु, सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ तांत्रिक कारणाने 26 डिसेंबर, 2025 पासून निष्क्रिय झाल्याने इच्छुक उमेदवार वेबलिंकपर्यंत पोहचू शकत नाहीत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यास 9 जानेवारी, 2026 संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32786/96173/Index.html या वेबलिंकचा वापर करुन ऑनलाईन अर्ज भरावेत, असे लातूर येथील जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी कळविले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत