अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिरात प्राप्त तक्रारी निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करणार -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.
अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिरात प्राप्त तक्रारी निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करणार - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. लातूर , दि. 3 1 ( जिमाका): महिलांच्या समस्यांचे स्थानिकस्तरावर निराकरण करण्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात प्राप्त तक्रारी निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. राज्यातील महिलांसाठी शासनाच्या विविध विभागांमार्फत राबण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना देण्यासाठी, तसेच शहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित अहिल्यादेवी होळकर स्त...