मधमाशा पालन उद्योगामध्ये उत्कृष्ठ काम केलेल्या लाभार्थ्यास मधमाशी मित्र पुरस्कार वितरण येत्या 20 मे रोजी
.
मधमाशा पालन उद्योगामध्ये उत्कृष्ठ काम केलेल्या
लाभार्थ्यास
मधमाशी मित्र पुरस्कार वितरण येत्या 20 मे रोजी
लातूर,दि.2 (जिमाका)- मध संचानालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाबळेश्वर
जिल्हा सातार येथे दि. 20 मे, 2023 रोजी जागतिक मधमाशी दिनांचे औचित्य साधुन
मधमाशा पालन उद्योगामध्ये उत्कृष्ठ काम केलेल्या लाभार्थ्यांना मधमाशी मित्र
पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. मंडळाचे मध संचानालय महाबळेश्वर येथे पुरस्कार
वितरण सोहळा 20 मे, 2023 रोजी आयोजित केलेला आहे. तेंव्हा मधमाशा उद्योगामध्ये
सातेरी, मेलीफेरा व आग्या मधमाशांचे संगोपन करुन मधाचे उत्पादन घेण्याऱ्या व्यक्ती
/ संस्था यांच्याकडून पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार या करीता अर्ज मागविण्यात
येत आहे.
तरी
जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, व्दारा जिल्हा उद्योग
केंद्र, लातूर या ठिकाणी अर्जासाठी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग
अधिकारी लातूर यांनी केले आहे.
अधिक
माहिती साठी संपर्क जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ईरबा शंकर वाघमारे मो.नं.9860404917, औद्योगीक पर्यवेक्षक लातूर
महादेव भगवान बेळंबे मो.नं.8766855890
****
Comments
Post a Comment