लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे 2 ते 11 मे या कालावधीत विविध खेळांचे मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबीर

 

लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे 2  ते 11 मे या कालावधीत

 विविध खेळांचे मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबीर

लातूर,दि.2 (जिमाका)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा संकूल समिती, जिल्हा क्रीडा परिषद यांच्यामार्फत दि. 2 ते 11 मे 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल येथे खेळांचे शासनामार्फत मोफत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येत आहे.

या प्रशिक्षण शिबीरामध्ये कुस्ती, खो-खो, क्रिकेट या खेळांचा समावेश आहे. या खेळामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, यासाठी प्राचार्य ,मुख्याध्यापकांनी शाळेमधील, संस्थेमधील विद्यार्थ्यांना योग्य सूचना द्यावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

 सर्व खेळांची ओळख तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन , विशेष राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूची प्रशिक्षणास भेट, मार्गदर्शन देऊन मुलांच्यातील सूप्त गुणांना वाव देण्यासाठी, भविष्यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणे हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.

अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंढे मो.नं. 8275273917 व चंद्रकांत लोदगेकर मो.नं.9420292155 यांच्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी म्हटले आहे.

                                                    ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा