जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी खरेदीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

 जिल्हा माहिती कार्यालयातील

रद्दी खरेदीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

 लातूर, दि.25 (जिमाका): जिल्हा माहिती कार्यालय, लातूर येथील वृत्तपत्रांची व मासिकांची रद्दी विक्री तसेच मोडतोड झालेल्या वस्तूंची भंगार म्हणून विक्री करण्यात येणार आहे. यासाठी नोंदणीकृत रद्दी खरेदीदारांनी आपली दरपत्रके दिनांक 5 जून 2023 पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुक रद्दी खरेदीदारांनी आपली दरपत्रके बंद लिफाफ्यात मा. जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, उत्तर बाजू, लातूर या पत्यावर दिनांक 5 जून  2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सादर करावीत. कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. रद्दी खरेदीदाराकडे इलेक्ट्रॉनिक वजन काटा असणे बंधनकारक आहे. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयात पाहता येतील.

रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे, तसेच संपूर्ण रद्दी विक्री प्रक्रिया रद्द करण्याचे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, लातूर यांना राहतील, असे लातूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा