लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर 6 मे रोजी जिल्हास्तरीय समुपदेशन मेळाव्याचे आयोजन

 

लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर

                 

6 मे रोजी जिल्हास्तरीय समुपदेशन मेळाव्याचे आयोजन

 

 लातूर,दि.2 (जिमाका)- येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराज  युवाशक्ती करिअर शिबीराचे दि. 6 मे, 2023 रोजी जिल्हास्तरीय समुपदेशन मेळाव्याचे आयेाजन करण्यात आले आहे, असे लातूर औद्योगिक‍ प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.

लातूर जिल्ह्यातील दहावी ते बारावी सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी लातूर व प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर यांनी केले आहे. व सर्व शाळा,कॉलेज, महाविद्यालये यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन करण्यात आले.

पंतप्रधान तथा कौशल्य रोजगार व व्यवसाय प्रशिक्षण नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर यांच्या माध्यमातून छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करियर शिबीर जिल्हास्तरिय समुपदेशन मेळावा थोरमोटे लॉन्स, छत्रपती चौक, औसा रोड लातूर येथे दि. 6 मे 2023 रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मंत्री ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सर्व स्थानिक आमदार जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.,मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.

दहावी व बारावीनंतर पुढे काय? सतत भेडसावणाऱ्या प्रश्नामुळे आजकालच्या तरुन पीढीला मानसीक उद्ग्नतेतून जावे लागत आहे.योग्य वयात योग्यवेळी योग्य दिशानिर्देश मिळणे हे कदाचित दिशाहीन झालेल्या युवकांपेक्षा जास्त कोण स्पष्ट करु शकते. तेंव्हा समुपदेशनाच्या माध्यमातून मुलांचा कल ओळखून मार्गक्रम करणे सोयीचे  ठरणार असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे.  

****

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा