मरशिवणी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरु
मरशिवणी
येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची
शासकीय
निवासी शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरु
लातूर, दि.25(जिमाका): मरशिवणी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत
चालविली जाते. या शाळेत शैक्षणिक वर्ष
2023-24 साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या शाळेत इयत्ता सहावी ते
दहावी वर्गासाठी रिक्त जागेवर मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
प्रवेशासाठी अनुसुचित
जाती 80 टक्के, अनुसूचित
जमाती 10 टक्के, विमुक्त जाती भटक्या जमाती 5 टक्के, दिव्यांगासाठी 3 टक्के व एस.बी.सी. साठी 2 टक्के आरक्षण राहील. निवास,
भोजन, वह्या, पाठ्यपुस्तके
व गणवेश इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध आहेत.
शाळेसाठी प्रशस्त तीन मजली इमारत खेळाचे भव्य मैदान, अनुभवी
शिक्षक वृंद, संगणक प्रयोगशाळा, जीम,
जिम्नॅस्टिक्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध असल्याचे
मरशिवणी अनुसूचित जाती, नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेच्या
मुख्याध्यापकांनी कळविले आहे.
*****
Comments
Post a Comment